Vinod Tawde | महाराष्ट्राचे ‘भावी मुख्यमंत्री’ विनोद तावडे?, विनोद तावडे म्हणाले – ‘राज्याच्या राजकारणात मला… ‘

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP) नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) तिकीट कापण्यात आले. यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले असले तरी ते राज्याच्या राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री (Maharashtra CM) म्हणून विनोद तावडे (Vinod Tawde) यांचे नाव चर्चेत असतं. यावर बोलताना विनोद तावडे म्हणाले, राज्याच्या राजकारणात मला सध्या तरी स्वारस्य नाही, केंद्रीय राजकारणात बरंच शिकायला मिळतंय, त्यामुळे मी तिकडेच खूश असल्याचे तावडे यांनी सांगितले. तावडे यांनी भावी मुख्यमंत्र्याच्या चर्चेवर पडदा टाकला.
विनोद तावडे (Vinod Tawde) यांची एका वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना बाजूला सारून विनोद तावडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सोशल मीडियात असते, असे विचारण्यात आले. यावर बोलताना तावडे म्हणाले, या गोष्टीमध्ये अजिबात तथ्य नाही. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. मला महाराष्ट्रात येण्यास रस नाही. मला केंद्रात काम करायला आवडेल. केंद्राच्या राजकारणात खूप शिकायला मिळतंय. मात्र ज्यावेळी माझी राज्याला गरज असेल त्यावेळी मी नक्की सहकार्य करेन असेही तावडे यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधाताली गटामध्ये विनोद तावडे असल्याच्या काही बातम्या येत आहेत. यावर बोलताना तावडे म्हणाले, राज्याच्या भाजप संघटनेमध्ये दोन गट नाहीत. महाराष्ट्र भाजप (Maharashtra BJP) संघटित असून एकदिलाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
एक मराठी माणूस 2024 सालच्या निवडणुकीत देशाच्या राजकारणात एक महत्त्वाची भूमिका बजावतोय हे निश्चितच अभिमानास्पद आहे.
प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांच्यानंतर मला हे काम करायला मिळतंय, असेही तावडे यांनी स्पष्ट केलं.
विनोद तावडे पुढे म्हणाले, गेल्या लोकसभेवेळी जिंकलेल्या 303 जागा आणि
इतर 60 जागांवर भाजपने लक्ष्य केंद्रीत केलं असून पढील वर्षभर यावर काम केले जाणार आहे.
राज्यात भाजप 45 टक्के मंत मिळवेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Web Title :- Vinod Tawde | bjp vinod tawde exclusive on devendra fadanvis and maharashtra future cm post on social media
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update