पंकजा मुंडेंच्या मनधरणीसाठी विनोद तावडे ‘रॉयलस्टोन’वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मनधरणीसाठी भाजपाकडून धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. भाजपाचे नेते बबनराव लोणीकर यांनी दुपारी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. लोणीकर यांच्या भेटीनंतर माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे हे पंकजा यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. तावडे यांच्याबरोबर माजी राज्यगृहमंत्री राम शिंदे हे बरोबर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांची रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी बैठक सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. पंकजांचे बंधू धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत बाजी मारली. हा पराभव पंकजा मुंडे यांच्या जिव्हारी लागला आहे. पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट शनिवारी व्हायरल झाली होती. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं?, यासंबंधी मी 12 डिसेंबर रोजी सांगणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. तर आज ट्विटरवर अकाऊंटवरून भारतीय जनता पक्षाचे नाव हटविले आहे. या गोष्टींमुळे पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देऊन वेगळा विचार करणार का ? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्या पक्षातच राहणार असून त्या पक्षांतर करणार या अफवा असल्याचे काल सांगितले होते.

Visit : policenama.com

Loading...
You might also like