‘अजित दादा कधी रागवतात तर, कधी हुंदका काढतात, हे सगळं नाटक’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांचे डोळे पाणावले. त्यांच्या डोळ्यातील पाणी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्यानंतर पहिल्यांदाच सरकार मधील मंत्र्याने अजित पवारांवर टीका केली आहे. अजित दादा कधी रागवतात तर, कधी हुंदका काढतात हे सगळं नाटक आहे अशा शब्दात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पवारांना टोला लगावला आहे.

विनोद तावडे यांनी ‘मी नव मतदार, विकासाचा भागीदार’ या शिर्षकांतर्गत ‘काॅफी विथ युथ’ या कार्यक्रमादरम्यान त्यांनी नव मतदारांशी संपर्क साधला. नव मतदारांचे हक्क, अधिकार, त्यांचे कर्तव्य आणि सरकरने नव मतदारांकरिता काय केले या सर्वांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तर देत त्यांच्याशी संवाद साधला.

अजित पवारांवर टीका करताना विनोद तावडे म्हणले, दादा कधी रागावतो तर, कधी हुंदका काढतो हे सगळं नाटक असतं अशा शब्दात टोला लगावला. तसेच राजकारणात सगळे वाईट नाही तसे चांगलेही नाही असे सांगत राजकारणात येण्याचे तसेच डोळसपणे मतदान करण्याचे आवाहन त्यांनी नव मतदारांना केले. मोदींचे कौतुक करताना म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून यायला नरेंद्र मोदींची गरज पडते, अमेरिकेलाही आपल्याबरोबर मैत्री करावी वाटते अशा शब्दात त्यांनी मोदींचे कौतुक केले.

Visit : policenama.com