शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या मुलीचा स्टायलिश अंदाज

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात ७१ जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. सर्व जण वेळात वेळ काढून मतदान करत आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह त्यांची मुलगी अन्वीने सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे. सध्या अन्वी तावडे फॅशन सेन्स चर्चेत आहे.

तिचा अनोखा लुक सोशल मिडियावर पहायला मिळत आहे. फोटोमध्ये तिच्या केसांचा कलर त्याचबरोबर टोचलेले नाक यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा लुक आलेला आहे. त्यामुळे तिचा फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

अन्वी तावडे पुण्यातील सिम्बॉयसिस स्कूल फॉर लिबरल आर्टस मध्ये शिक्षण घेत आहे. फेसबुक वर तिचे अनेक वेगवेगळे लुक पाहून तिला वेगवेगळ्या लुक मध्ये फोटो शेअर करायला आवडत असल्याचे समजते त्याचबरोबर केसांना छान हेअर कलर करणे देखिल पसंत असल्याचे दिसते. कारण अनेक फोटोमध्ये तिचे अनोखे अंदाज पाहून तिला नाकामध्ये रिंग घालण्यास आवडते आणि ते तिला शोभते. त्यामुळे तिच्या प्रत्येक फोटो मध्ये नाकामध्ये छान छान रिंग पहायला मिळत आहे.