‘लाज कशी वाटत नाही’ हे विचारायला तुम्हाला लाज कशी वाटत नाही : विनोद तावडे यांचा सवाल

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – लाज कशी वाटत नाही या टॅगलाईनने प्रचार करणार असल्याचे आघाडीने काल जाहिर केले होते. त्याला शिक्षणमंत्री  विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या काळात हजारो कोटींचा सिंचन घोटाळा केला, मुख्यमंत्री पदावर असताना आदर्श घोटाळा केला, त्यामुळे मुख्यमंत्रीपद गेले त्याची लाज कशी वाटत नाही, शेतकऱ्यांनी पाणी मागितल तर धरणात करंगळी वर केली.. याची लाज वाटत कशी नाही असे रोखठोक प्रत्युत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विरोधकांना दिले आहे. लाच कशी वाटत नाही हे विचारायलाच तुम्हाला लाज कशी वाटत नाही, असा प्रतिसवाल विनोद तावडे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला केला आहे.

लाज कशी वाटत नाही अशी निवडणूक प्रचाराची टॅगलाईन करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्याला इतकं निगरगट्टपणे ‘लाज कशी वाटत नाही’ हे कसे विचारु शकता असा प्रश्न विचारत तावडे म्हणाले, साडेचार-पाच वर्षात आमच्या सरकारने विकासाची कामे केली, आपल्या देशाची सुरक्षा वाढली तसेच खऱ्या अर्थाने या राष्ट्राची आर्थिक प्रगती झाली. हे सोडून केवळ राजकारणासाठी इतक्या निगरकट्टपणे कुठला पक्ष कसा प्रचार करु शकतो याचे आश्चर्य़ वाटते.

पृथ्वीराज चव्हाण यांनी बहुदा गेल्या १० वर्षात प्रथमच शरद पवार आणि अजित पवार यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केलेल आपल्या वाचनात आले, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे मनापासून बोलले की, निवडणूकीपुरत बोलले. निवडणूकीसाठी महाआघाडी म्हणून एकत्र आले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या बाजूने बोलण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे का, हे पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याला सांगावे असा टोला तावडे यांनी लगावला.

Loading...
You might also like