विनोद तावडे मंत्रिपद झेपत नसेल तर राजीनामा द्या 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांशी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान विविध घोषणा देण्यात आल्या.

अमरावती येथे विद्यार्थ्यांशी बोलताना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना, “आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही. सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय?” असा प्रश्न विद्यार्थ्यां तर्फे विचारण्यात आला दरम्यान ‘तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको.

नोकरी कर”, असे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले होते. इतकेच नव्हे तर त्यावेळी मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करणाऱ्या विद्यार्थाला त्यांनी रेकॉर्डींग डिलीट कर असे म्हटले होते. तसेच त्यावर ‘या विद्यार्थ्यांना अटक करा आणि त्यांचे मोबाईल काढून घ्या’ असे आदेशही विनोद तावडे यांनी दिले होते. त्यांच्या आदेशानंतर विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यातही घेतले होते आणि त्याच्या मोबाईलमधले रेकॉर्डींग डिलीट करण्यात आली होते.

याचाच निषेध म्हणून एफ.सी. रोडवरील गुड लक कॅफे समोर पुणे आम आदमी पार्टी तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यानी शिक्षकाना बेधडक प्रश्न विचारावेत, ही शिकवण देणे शिक्षणाचे काम. तावडे मात्र ‘हाताची घडी तोंडावर बोट’ या पद्धतीचे प्रोडक्ट आहे. आंदोलनात ”शिक्षण विनोदाच्या तावडीत आणि प्रश्न विचारणारा कोठडीत” ‘झेपत नाही,शिक्षण सोडा नव्हे, तावडे खुर्ची सोडा’, तसेच शिक्षणाचा विनोद करणे थांबवा विनोद तावडे, मंत्रिपद झेपत नसेल तर राजीनामा द्या अश्या अनेक घोषणा देण्यात आल्या.

इतकेच नव्हे तर आज पीएचडी , बीएड मुले रस्त्यावर येवून आंदोलन करत आहेत तर हमालाच्या जागेसाठी लाखो पदवीधर अर्ज करीत आहेत. असें असताना या मुलांना आर्थिकदृष्ट्या झेपत नसेल तर त्यांनी कोणत्या नोकऱ्या कराव्यात हे सुद्धा मंत्री विनोद तावडे यांनी सांगावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

इतकेच नव्हे तर  ‘तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर”, असे गंभीर विधान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. प्रत्यक्षात दुष्काळग्रस्त मुलांची परीक्षा फी माफी केल्याचे , स्वतःची पाठ थोपटून घेणारे बंनेर भाजपा ने शहरात लावले होते. गेल्या दशकात महाविद्यालयीन शिक्षण ही फक्त आर्थिक दृष्ट्या श्रीमंता चा हक्क झाला आहे.

व्यावसायिक शिक्षण हे सामान्य नागरिकांच्या आर्थिक कुवतीच्या बाहेर गेले आहे. एकीकडे विद्यापीठ खाजगीकरण, कंपनी शाळा , अवाजवी फी वाढ मान्य करणारे कायदे करत आणि दुसरीकडे शिक्षणासारख्या मुलभूत अधिकारांची गळचेपी करत तरुणांना ‘आरक्षणाच्या भ्रामक स्वप्नांमध्ये’ गुंतवण्याचे काम भाजपा सरकार करत आहे असा आरोप आपचे मुकुंद किर्दत यांनी केला.

यावेळी रंगा राचुरे राज्य उपाध्यक्ष , मुकुंद किर्दत अध्यक्ष पुणे, अजिंक्य शिंदे ,संदीप सोनवणे, सावन राऊत, योगेश इंगळे, चेतन बेंद्रे, स्वप्नेष कुंजीर, श्रीकांत आचार्य , महेश स्वामी, अभिजीत मोरे, तुषार कासार , निखिल खळे, अजिंक्य पुटाने,मुजुमदार काका , दत्तात्रय कदम,प्रवीण भाहिर, संदीप घोडके, निखील खळे , महेश स्वामी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.