Homeराजकीयविनोद तावडेंची हरियाणा प्रभारी म्हणून नियुक्ती, तर पंकजा मुंडेंकडे मध्य प्रदेशचे सहप्रभारी...

विनोद तावडेंची हरियाणा प्रभारी म्हणून नियुक्ती, तर पंकजा मुंडेंकडे मध्य प्रदेशचे सहप्रभारी पद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहार निवडणुकांच्या यशानंतर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय स्तरावर संघटनात्मक फेरबदल केले असून, अनेक राज्यांचे प्रभारी बदलले आहेत. यात महाराष्ट्रातील (Maharashtra) नेत्यांकडे अनेक मोठी जबाबदारी सोपवली आहे.

भारतीय जनता पक्षाने (BJP) शुक्रवारी 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी पक्षाचे प्रभारी आणि सह प्रभारींची यादी जाहीर केली असून, त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला झुकते माप दिले आहे. यात राज्याचे माजी शिक्षणमंत्री असलेल्या विनोद तावडे (Vinod Tawde) यांना हरियाणा भाजप प्रभारी पदी नियुक्त केले आहे. सुनील देवधर (Sunil Devdhar) यांची आंध्र प्रदेश सहप्रभारी पदी, पंकजा मुंडे (Pankja Munde) यांची मध्य प्रदेश सहप्रभारी पदी आणि विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) यांची दमन दीव – दादरा – नगर हवेली प्रभारी पदी नियुक्ती केली आहे.
तर महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी असतील. रवी यांच्याकडे महाराष्ट्रासह गोवा आणि तामिळनाडूचीही जबाबदारी दिली आहे. आगामी काळात महत्त्वाच्या असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदी राधा मोहन सिंह यांची नियुक्ती केली आहे, तर पश्चिम बंगालची जबाबदारी कैलास वर्गिय यांच्याकडे सोपवली आहे.

आज भाजपच्या केंद्रीय स्तरावर अनेक संघटनात्मक फेरबदल केले. आगामी काळात प. बंगाल आणि उ. प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांकडे भाजप पक्षश्रेष्ठींचे विशेष लक्ष असणार आहे. राज्यातून केंद्रात गेलेल्या भाजपच्या नेत्यांनाही या फेरबदलात मोठी जबाबदारी मिळाली आहे.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News