… म्हणून भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर आता राज्यात भाजपा कोणाला प्रदेशाध्यक्षपदी बसविणार, याची चर्चा जोरात सुरु झाली आहे. त्यात अनेक नावे चर्चेत आली होती. त्यात चंद्रकांतदादा पाटील यांचे नाव सर्वात जास्त चर्चेत होते. मात्र, त्यांनी नकार दिल्याने आता पक्षश्रेष्ठी विनोद तावडे यांच्या नावाचा विचार करीत असल्याची चर्चा पुढे आली आहे.

प्रदेशाध्यक्ष असताना रावसाहेब दानवे यांच्या गावरान भाषेतून केलेल्या बेधडक वक्तव्याने पक्ष अनेक वेळा अडचणीत आला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता शहरी तोंडवळा असलेला व नरम व्यक्तीमत्वाचा शोध भाजपा पक्षश्रेष्ठी घेत होते. त्यात चंद्रकांतदादा पाटील हे फिट बसत असल्याने सर्वात प्रथम त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला. मात्र, इतक्या अल्पकाळात हातातील महत्वाची खाती सोडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास दादांनी तयारी नसल्याचे पक्षश्रेष्ठींना सुचित केले.

त्यामुळे दादांचे नाव मागे पडल्यावर आणखी काही नावांची चर्चा झाली. मात्र, राज्यभर फिरुन विधानसभेसाठी काम करायची तयारी बहुतेकांची नसल्याचे व त्यांची तेवढी राज्यभर पसंती दिसून आली़ नाही.

त्यानंतर विनोद तावडे यांच्या नावावर चर्चा सुरु झाली आहे. विनोद तावडे हे शहरी तसेच ग्रामीण भागात परिचित व्यक्तीमत्व असून तरुणांमध्येही ते लोकप्रिय आहेत. तसेच ते वादग्रस्तही नाहीत, त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. मंत्रीमंडळ विस्तारात त्यांच्याकडील शालेय शिक्षण़ क्रीडा व युवक कल्याण निधी ही दोन खाती काढून आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

अर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका

अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे