धक्कादायक ! विनयभंग करून महिलेवर धर्मांतरासाठी दबाव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महिलेशी लज्जास्पद वर्तन करून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव व पैशाच्या स्वरूपात खंडणी मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अर्शद हमीद मंसुरी (रा. इंदिरानगर, कोपरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, कोपरगाव शहरात महिलेच्या पतीचे दुकान आहे. पती बाहेरगावी असताना महिला दुकानावर राहत होती. त्यावेळी अर्शद मंसुरी हा नेहमी दुकानात येत होता. महिलेचा पती नसताना दुकानात येऊन तो तिच्याशी ओळख वाढवू लागला. तिचा मोबाईल नंबर घेऊन वारंवार फोन करू लागला. डिसेंबर 2018 पासून ते दि. 20 जून 2019 रोजी दरम्यान पैशाची खंडणी स्वरूपात मागणी करून धर्मांतर करण्याचा दबाव आणत होता. 20 जून रोजी त्याने महिलेशी लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केला. तसेच शिवीगाळ, दमदाटी केली. घटना घडली त्यावेळी महिलेचे पती बाहेरगावी असल्याने तिने फिर्याद दिली नव्हती.

याप्रकरणी काल दुपारी सदर महिला तिच्या पतीसोबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गेली. तिच्या फिर्यादीवरून अर्शद मंसुरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आर. बी. भालेराव हे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –