उदयनराजेंच्या समर्थकांनी सातार्‍यात रामराजेंचा पुतळा जाळला

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वादाने आता हिंसक वळण घेतले आहे. बारामती इंदापूरला दिला जाणारे पाणी देण्यावरून भडकलेला वाद आता जाळपोळीवर येऊन थांबला आहे. शनिवारी या प्रकाराला हिंसक वळण मिळाले. उदयनराजे यांच्यावर रामराजे निंबाळकर यांनी टीका केल्यानंतर उदयराजे यांच्या समर्थकांकडून पोवईनाका येथे रामराजे निंबाळकरांचा पुतळा जाळून निषेध केला आहे.

कोणी कोणाचे पाणी पळवलेले नाही, रामराजेंनी कधीही पाण्याबाबत राजकारण केले नाही, मात्र, आमचे स्वयंघोषित छत्रपती खासदार उदयनराजे भोसले काही चक्रमांना घेऊन भलते सलते आरोप करत आहेत अशी खोडकर टीका रामराजे यांनी काल उदयनराजे यांच्यावर केली होती.

बारामतीला नीरा देवघर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरून राजकारण तापले होते. उदयनराजे यांनी रामराजेवर यावरुन टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून रामराजेंनी देखील उदयनराजे, जयकुमार गोरे आणि रणजीतसिंह निंबाळकर यांच्यावर टीका केली होती.

रामराजे निंबाळकर यांनी उदयनराजेंवर टीका केल्याने उदयनराजे समर्थक आणि राजे प्रतिष्ठाण कार्यकर्त्यांनी साताऱ्यात पोवईनाका येथे रामराजे निंबाळकर यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नितीन शिंदे यांना ताब्यात घेतले आहे.

सिने जगत –

आजही ‘या’ अभिनेत्याला मुलं घालतात लग्‍नाची मागणी, येतात अश्‍लील मेसेज्स

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत

‘या’ गोष्टींमुळे ‘परेशान’, ‘हैराण’ असतात एकटे राहणारे (सिंगल) ; हे आहेत उपाय, घ्या जाणून