साताऱ्यात आंदोलनाला हिंसक वळण, पोलीस अधीक्षक जखमी

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणासाठी संतप्त झालेल्या समाजबांधवांचा मोर्चा संपल्यानंतर बुधवारी दुपारी जमावाने आक्रमक पवित्रा घेत पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. जमाव आणखी हिंसक झाल्याने पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला. दगडफेकीत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह दोन कर्मचारी जखमी झाले.
[amazon_link asins=’B014PHNO2Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3ef506d5-8fe8-11e8-830e-ebaf36e88fda’]

मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी दुपारी मोर्चा काढला. मात्र, त्यानंतर अचानक महामार्गावरील वाहनांवर दगडफेक सुरू झाली. काही संतप्त जमावाने पोलीस व्हॅनलाच लक्ष्य केले. दगडफेकीत पोलीस व्हॅनचे आणि एका कंटेनरचे मोठे नुकसान झाले.

जमाव आणखीनच हिंसक बनत चालल्याने पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी जमाव विखुरला होता. पोलिसांनी पाठलाग करून काही जणांना ताब्यात घेतले. अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना मोठा फौजफाटा महामार्गावर तैनात करावा लागला.