‘VIP’ कडून राज्यभर वाहतूक नियमांची ‘पायमल्ली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘एक राज्य एक चलन’ अंतर्गत राज्यभरात विविध ठिकाणी वाहतूकीचे नियम मोडल्यानंतर दंड न भरल्याने मोठ्या प्रमाणावर दंड बाकी असलेल्या चार चाकी वाहनांच्या क्रमांकांची यादी राज्य वाहतूक विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हा पोलीस दले व पोलीस आयुक्तालयांना पाठविण्यात आली आहे. त्यातील क्रमांकावरुन वाहनांचे मालक निष्पन्न करुन त्यांच्याकडून दंड वसुल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वाहन क्रमांकांवरुन वेगवेगळ्या जिल्ह्यातील राजकीय नेते, पदाधिकारी या व्हीआयपींनी राज्यभर वाहतूकीचे नियम मोडले असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील एका माजी खासदाराच्या पुत्राच्या वाहनावर तब्बल २५ हजार रुपयांचा दंड झाल्याचे दिसून आले आहे. वाहतूक नियम मोडलेल्या जळगाव जिल्ह्यातील ३८ वाहनांची यादी जिल्हा पोलिसांना मिळाली आहे. त्यात जिल्ह्यातील राजकीय पुढारी, पदाधिकारी, बड्या व्यक्तींच्या वाहनांचा सर्वाधिक समावेश असल्याचे दिसून आले आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांतील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून या वाहनांची माहिती घेण्याचे काम सुरु झाले असून संबंधित वाहनधारकाचे नाव निष्पन्न झाल्यानंतर वाहनमालकाने दंड न भरल्यास वाहने जमा करण्यात येणार आहे. जोपर्यंत दंड भरण्यात येणार नाही तोपर्यंत वाहना कारवाईशिवाय सोडून देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या व्हीआयपींच्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.

Visit : policenama.com