अहमदनगरच्या लोणी येथील विराज राजेंद्र विखे – पाटील याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लोणी येथील विराज राजेंद्र विखे याच्याविरुद्ध महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग करून तिचे बनावट फेसबुक खाते तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

विराज राजेंद्र विखे (रा. लोणी, ता. राहता) हे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, सदर युवती हटसन 2017 ते 2018 मध्ये प्रवरानगर लोणी, ता. राहता येथे पद्श्री विखे पाटील ज्युनियर व सीनियर कॉलेजला शिक्षण घेत होती. त्यावेळी विराज याने युवतीचा पाठलाग करून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे म्हणून तू जर मला होय म्हणाली नाही तर मी माझे जीवाचे बरे-वाईट करीन, असे म्हणून वेळोवेळी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे युवती क्षण अर्धवट सोडून अहमदनगर येथे पुढील शिक्षण घेत होती. त्यानंतर विराज याने युवतीच्या नावाचा वापर करून फेसबुकवर फेक अकाउंट खोलले.

तिची बदनामी करण्याच्या हेतूने नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट टाकून विराज हा अहमदनगर येथे आला आहे, असे लोकेशन फेसबुकवर टाकून युवकीवर भीती दाखवून दबाव आणण्याचा प्रयत्न करून पाठलाग केला.पीडित युवतीच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात रात्री उशिरा शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा लोणी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –