#Viral : विराटने ‘असा’ साजरा केला अनुष्काचा वाढदिवस, शेअर केला रोमँटीक व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांची जोडी सर्वांनाच आवडते. तुम्ही क्रिकेटचे फॅन असो अथवा सिनेमांचे विराट आणि अनुष्काला एकत्र पाहणं सर्वांना आवडतं. जसं अनुष्का विराटच्या चांगल्या वाईट काळात त्याला साथ देते तसंच विराट कोहली देखील अनुष्कासाठीचं त्याचं अनकंडिशनल प्रेम जगासमोर व्यक्त करायला अजिबात चुकत नाही.

१ मे (बुधवार) रोजी अनुष्का शर्माचा बर्थ डे होता. विराटने आपल्या पत्नीचा वाढदिवस आणखी स्पेशल करण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. या खास क्षणी विराट आणि अनुष्का नदीच्या किनारी बसून सुखाने एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसून आले. बॅकग्राऊंडला एक गाणंही सुरु असल्याचं दिसत आहे. असाच विराट आणि अनुष्काचा एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. यात विराट आणि अनुष्का जगाची चिंता दूर सारून खुश असल्याचं दिसत आहे. विराटने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओ चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

♥️ Credit – @suppeerrgram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

सध्या हा रोमँटीक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओव्यतिरीक्त विराटने अनुष्कासोबत एक छानसा फोटोही शेअर केला आहे. या फोटोत अनुष्का विराटच्या खांद्यावर डोके ठेवून बसलेली दिसत आहे. विराटने ही तिच्या खांद्यावर हात ठेवला आहे. या फोटोने तर चाहत्यांच्या काळजात घर केलं आहे.

विराट आणि अनुष्का आपल्या स्पेशल मूमेंट्सला चाहत्यांसोबत शेअर करायला अजिबात विसरत नाहीत. विराटने अनुष्कासोबत पूर्ण दिवस स्पेंड केला. दोघंही अशा जागेवर होते जिथे कोणी फॅन नाही, ना ऑटोग्राफ, ना ही सेल्फीची डिमांड. यानंतर विरुष्का रोमँटीक डिनर करतानाही दिसून आले होते.

anushka-sharma-virat-kohli-romantic-video-viral-virushka

You might also like