RBIला दुसरा झटका, डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला आहे. आचार्य यांचा कार्यकाळ संपण्यास सहा महिन्यांचा अवधी शिल्लक होता. अवघ्या सात महिन्याच्या अंतरात आरबीआयसाठी हा दुसरा झटका आहे. याआधी उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देत सर्वांना धक्का दिला होता. २०१७ यामध्ये त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

सहा महिने आगोदरच राजीनामा

विरल आचार्य हे २३ जानेवारी २०१७ रोजी या पदावर रुजू झाले होते. या पदावर त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आली होती. मात्र आपला कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी सहा महिने बाकी असतानाच राजीनामा दिला. उर्जित पटेल यांच्या टीममधील ते महत्वाचे सदस्य होते. त्यामुळे त्यांच्या या राजीनाम्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर गव्हर्नरपदी नियुक्त करण्यात आलेल्या शक्तिकांता दास यांच्याशी त्यांचे मतभेद होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे देखील बोलले जात आहे.

दरम्यान, मोदी सरकारच्या कार्यकाळात हा तिसरा मोठा राजीनामा ठरला आहे. गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यानंतर अरविंद सुब्रमण्यम यांनी देखील जुलै २०१८ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता विरल आचार्य यांनी देखील राजीनामा दिला आहे.

आरोग्य विषयक वृत्त

रात्री २ विलायची खाऊन १ ग्लास गरम पाणी प्या ; होईल ‘ही’ कमाल

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

एक कप ग्रीन टी नियमित घेतल्यावर होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय