दिल्लीचा प्रमुख ‘उत्सव’, प्रदूषणावरील मुलाचा ‘निबंध’ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली एनसीआरमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढतच चालले आहे. रोजच्या जीवनात सुद्धा सर्वांना प्रदूषणाचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. यामुळे दिल्ली प्रशासनाने येथील शाळांना सुट्ट्या देखील जाहीर केल्या होत्या. मात्र वारंवार शाळांना सुट्ट्या द्याव्या लागत असल्यामुळे एका मुलाने याबाबत निबंध लिहीला आहे.

हा निबंध सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील होत आहे. लोक या निबंध मोठ्या प्रमाणावर शेअर देखील करत आहेत.

नेमकं काय लिहिलंय या निबंधामध्ये
आता पासून प्रदूषण हा दिल्लीचा प्रमुख उत्सव आहे. हा उत्सव नेहमी दिवाळी नंतर सुरु होतो, यामध्ये आम्हाला दिवाळीपेक्षाही अधिक जास्त सुट्ट्या मिळतात. दिवाळीत आम्हाला चार सुट्ट्या मिळतात मात्र प्रदूषणात आम्हाला 6+2 = 8 सुट्ट्या मिळतात. यामध्ये लोक वेगवेगळे मास्क लावून फिरतात. यावेळी घरामध्ये काळी मिरची, मध, आलं यांचा वापर वाढतो आणि मुलांना हे जास्त प्रमाणात आवडते.

दिल्लीची परिस्थिती गंभीर
‘दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे आणि धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. ही बाब सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून गांभीर्यानं घेतली गेली पाहिजे. हवेच्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विशेषतः मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल,’ असं ईपीसीएचे अध्यक्ष भुरेलाल यांनी सांगितलं होते.

Visit : Policenama.com