रतन टाटांच्या नावाने व्हायरल होत होता ‘हा’ फेक मेसेज, आता त्यांनी दिलं उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोविड -१९ संकटादरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणताही संदेश जलद व्हायरल होत आहे. सरकार आणि सोशल मीडिया कंपन्यांनी सतत अनेक पावले उचलल्यानंतरही फेक न्यूज व्हायरल होत आहे. भारतीय उद्योजक आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्याविषयीचा एक संदेशही यावेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या संदेशामध्ये कोविड -१९ शी संबंधित अर्थव्यवस्थेवर रतन टाटाच्या हवालाने काही गोष्टी बोलण्यात आल्या आहेत.

रतन टाटांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये त्याचा फोटो आणि वृत्तपत्राचा लेख आहे. या लेखात अश्या तज्ञांवर निशाणा साधला गेला आहे, ज्यांनी कोविड -१९ मुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त केली. यात लिहिले गेले कि, ‘तज्ञांविषयी मला फारसे माहिती नाही. पण मला मानवी प्रेरणा आणि कठोर परिश्रम याबद्दल नक्कीच माहिती आहे.

काय म्हणाले रतन टाटा ?
शनिवारी 82 वर्षीय रतन टाटाने याबाबत स्पष्टीकरण जारी केले आणि सोशल मीडियावर लिहिले की, ‘व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केलेल्या माहितीची पडताळणी करण्याची मी तुम्हाला विनवणी करतो’ त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या बनावट बातम्यांना नकार देत ते म्हणाले की, मला काही सांगायचे असेल किंवा काही माहिती द्यायची असेल, तर मी ती संबंधित माहिती अधिकृत वाहिनीमार्फत देईन.

रतन टाटा यांनी 500 कोटी रुपये देण्याची केली घोषणा
दरम्यान, 28 मार्च रोजी रतन टाटा यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली होती की, त्यांनी वैयक्तिक संरक्षक उपकरणाच्या विकासासाठी 500 कोटींची वचनबद्धता दिली आहे. या पीपीईचा वापर वैद्यकीय कर्मचारीद्वारे केला जाईल. तसेच, व्हेंटिलेटर, चाचणी किट आणि मॉड्यूलर उपचार सुविधांविषयी माहिती प्रदान केली गेली.