आजी-आजोबांच्या भन्नाट ‘डान्स’ चे ‘युझर्स’ झाले ‘दिवाने’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जर आपल्याला मनमुराद आनंद लुटायचा असेल तर तो आपण कुठेही कसाही आणि केव्हाही लुटू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपल्या नृत्यानं दोन जुळ्या भावांनी उपस्थित असणाऱ्यांच्या मनावर भुरळ घातली आणि मोठमोठ्या लोकांना तोंडात बोटं घालण्यास भाग पाडले इतके सुंदर नृत्य त्यांनी सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. तसेच त्यांनी हे सिद्ध करून दिले की मनसोक्त डान्स करण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं आपल्याला आवडत ते केलं आणि त्यातून आनंद मिळवला असा दृष्टीकोन असणाऱ्या या दोघांनीही डान्स करत आनंद साजरा केला आणि सर्वांना आनंददायी जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला.

त्यांचा नाच सुरु असताना अनेकांचेही पाय थिरकले आणि तेथील वातावरण हे पूर्णपणे बदलून अल्हाददायक झाले. सध्या त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून तुफान व्हायरल झाला आहे. प्रसंग कुठलाही असो आपण त्यात आनंद शोधायचा असतो असा आनंद या वृद्ध जुळ्या भावांनी शोधला आणि त्यांना तो गवसला देखील. त्यांचा आनंद पाहून बाकीच्यांनाही आनंदाची प्रचिती झाली.

सोशल मीडियावर जवळपास ३०१ हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ३६ हजार लोकांनी या व्हिडीओवर कमेंट दिल्या आहेत. ‘THIS is how everyone should enjoy Life!!!’ या कॅपशननं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या वृद्धांचा डान्स पाहून युझर्सही त्यांचे दिवाने झाले असून या वृद्ध भावांचा सध्या सगळीकडे बोलबाला होत असून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.