बदलत्या हवामानात वाढलाय वायरल इन्फेक्शनचा धोका ! ‘ही’ लक्षणं दिसल्यास व्हा सतर्क, ‘या’ 5 टिप्सने स्वत:ला ठेवा सुरक्षित

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हवामान बदलत आहे, ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा दिसून येत आहे. अनेक लोक सर्दी-ताप, अंगदुखी, खोकला, घशाची खवखव यासारख्या समस्यांचा सामना करत आहेत. ही लक्षणे दिसले तर लक्षात ठेवा हे वायरल इन्फेक्शन आहे. वायरल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी आपली इम्युनिटी मजबूत असणे आवश्यक आहे. आम्ही आज अशा 5 टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही वायरल इन्फेक्शनपासून बचाव करू शकता.

1 हळदीचा वापर लाभदायक –
जर अंगदुखी, नाकबंद, हलका ताप असा त्रास असेल तर रात्री झोपताना थोडी हळद टाकून गरम दूध प्या. हळद आणि मधाची पेस्ट करून सुद्धा तिचे सेवन करू शकता.

2 आले –
खोकला, ताप आणि घशात दुखत असेल तर आल्याचे सेवन करा. एक कप पाण्यात आले उकळवून ते पाणी प्या. तसेच आल्याच कडक चहा पिऊ शकता.

3 काळीमिरी, तूप आणि खडीसाखर –
खोकला आणि बंद नाकाची समस्या असेल तर एका छोट्या भांड्यात चार चमचे तूप घ्या. यानंतर त्यामध्ये 10 काळीमिरी आणि थोडी खडीसाखर वाटून टाका. नंतर हे मिश्रण मंद आचेवर गरम करा. कोमट झाल्यानंतर एक चमचा प्या. दिवसात दोन वेळा घ्या.

4 तुळशीचा काढा –
वायरल इन्फेक्शन तसेच निरोगी राहण्यासाठी तुळशीचा काढा सर्वात लाभदायक आहे. तुळस अँटीबॅक्टीरियल, अँटीवायरल गुणांनी युक्त आहे. दिवसातून एकदा सेवन करा.

5 नियमित व्यायाम आणि योग्य आहार –
योग्य आहार आणि नियमित व्यायामाने इम्युनिटी मजबूत राहते. सतत आजारी पडत नाही. हंगामी फळे आणि भाज्या डाएटमध्ये खाव्यात आणि संतुलित आहार घ्यावा.