सरसंघचालक मोहन भागवत नवीन संविधान बनवत असल्याची माहिती ‘व्हायरल’, RSS कडून पोलिसात तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सरसंघचालक मोहन भागवत भारताचे नवीन संविधान बनवत असल्याची एक पीडीएफ फाईल व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या या माहितीनं खळबळ उडाली आहे. डाव्या विचारसरणीच्या पक्षांकडून नेहमीच असा आरोप केला जातो की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानात बदल करत आहे. अशात आता ही माहिती व्हायरल होताना दिसत आहे.

याबाबत संघाकडून आरोप होताना दिसत आहे की, सरसंघचालक मोहन भागवत नवीन भारतीय संविधान बनवत असल्याचा खोटा प्रचार करण्यात येत आहे. त्याची एक पीडीएफ फाईल बनवून व्हॉट्सअ‍ॅपवर फिरवली जात आहे. या पीडीएफ फाईलच्या मुखपृष्ठावर सरसंघचालकांचा फोटोही लावण्यात आला आहे. हा प्रचार खोटा आहे. याशिवाय भागवत यांची बदनामी केली जात आहे असंही संघाकडून म्हटलं जात आहे.

सरसंघचालकांविरोधात चुकीची माहिती पसरवली जात आहे आणि अशी माहिती टाकणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी होताना दिसत आहे. याबाबत संघाकडून पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like