Viral Letter | दोन बालकांनी पीएम मोदी आणि सीएमला लिहिले ‘हे’ क्यूट पत्र, सांगितल्या आपल्या अडचणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Viral Letter | आसामच्या दोन बालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि आसामचे मुख्यमंत्री बिस्वा सरमा यांना पत्र लिहिले आहे. या बालकांनी पत्राच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांसमोर आपली समस्या मांडली आहे. या बालकांची समस्या इतकी क्यूट आहे की, ही पत्रे वायरल झाली आहेत. विशेष म्हणजे पत्रात लिहिलेले शब्द पाहून या गोष्टीचा अंदाज येतो की, ते या दोघांनी आपल्या हातांनी लिहिले आहे. बालकांची ही पत्रे सोशल मीडियावर (Viral Letter) लोकांना पसंत पडत आहेत.

या दोन बहिण-भावाचे नाव आहे रावजा आणि आर्यन. रावजाचे वय आहे 6 वर्ष तर आर्यन 5 वर्षांचा आहे. दोघांनी वेगवेगळी पत्र (Viral Letter) लिहिली आहेत.
आर्यनने पीएम मोदींसाठी लिहिले आहे की, प्रिय मोदीजी… मला तीन दात येत नाहीत, कृपया योग्य पाऊल उचला, यामुळे मला माझ्या आवडीचे खाणे खाण्यास त्रास होत आहे.

तर दुसरीकडे रावजाने आसामच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे की, प्रिय हिमंत मामा, मला दात येत नाहीत. कृपया आवश्यक कारवाई करा.
कारण मला खुप त्रास होत आहे आणि जेवण चावताना समस्येचा सामना करावा लागत आहे.
यासोबत दोन्ही मुलांनी पत्रात छोटी-छोटी चित्रे सुद्धा काढली आहेत.
या दोन भाऊ-बहिणीने पीएम मोदी आणि सीएम बिस्वा सरमा यांना वेगवेगळे पत्र लिहिले आहे.

 

ही पत्रे मुख्तार अहमद नावाच्या व्यक्तीने 25 सप्टेंबरला फेसबुकवर पोस्ट केली आहेत.
पोस्टसोबत त्यांनी लिहिले आहे की, नरेंद्र मोदीजी आणि हिमंत बिस्वा सरमाजी, माझी पुतणी रावजा आणि पुतण्या आर्यनने हे लिहिले आहे.
मी घरी नाही कामावर आहे, या दोघांनी स्वता लिहिले आहे.
प्लीज त्यांच्या दातासाठी काही काम करा कारण ते आपले आवडीचे जेवण चावू शकत नाहीत.

ही पोस्ट सोशल मीडियावर लोकांकडून मोठ्या प्रमाणात लाईक केली जात असून लोक शेयर सुद्धा करत आहेत.

 

Web Title : Viral Letter | letter to pm narendra modi and himanta biswa sarma from assam sibling

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Health Insurance Claim Tips | हेल्थ इन्शुरन्स क्लेम करताना ‘या’ 9 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात; जाणून घ्या

IAS-IPS | अवघ्या 75 कुटुंबाच्या ‘या’ गावात प्रत्येक घरात एक IAS किंवा IPS अधिकारी, जाणून घ्या विशेष गावाबद्दल

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,253 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी