आव्हानात्मक ! ‘या’ गणितीय समीकरणामुळे जगभरात नेटकऱ्यांमध्ये ‘भांडण’ ; तुम्ही सांगु शकता अचूक उत्तर ?

पोलीसनामा ऑनलाईन : इंटरनेटवर आजकाल मेंदूला ताण देणारी अनेक कोडी आणि  कूटप्रश्न व्हायरल होताना दिसतात. लोकदेखील मोठ्या प्रमाणावर यामध्ये रुची दाखवून तासंतास यावर डोके लावत बसताना दिसून येतात. सध्या सोशल मीडियावर असेच एक गणितीय समीकरण प्रचंड प्रमाणावर व्हायरल होत असून या गणिताने लोकांची अक्कल चांगलीच गुंग झाली आहे.
https://pemdascalculator.com

ओझरते पाहिल्यास पहिल्या नजरेत हे शालेय मुलांचे एक अत्यंत सामान्य समीकरण असल्याचे दिसून येते मात्र ते सोडविताना अनेकांच्या नाकी नऊ येत असताना दिसत आहे. इंटरनेटवरील अनेक नेटिझन्स ते अचूकरीत्या सोडविण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत.

तुम्ही या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊ शकता ? सोडवून पहा : 
सोमवारी एका ट्विटर यूजर ने पोस्ट केलेला हा बहुचर्चित प्रश्न ‘8 ÷ 2 (2 + 2)  याचे उत्तर काय असेल ?’ असा होता. काही वेळातच या ट्विट ला १३,००० पेक्षा अधिक लाईक्स मिळाल्या आणि ते जवळपास साडेतीन हजार वेळा रिट्विट देखील केले आहे. या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या हजारो कंमेंट्स या ट्विट वर आल्या आहेत मात्र कोणत्याही एका उत्तरावर लोकांची सहमती होताना दिसत नाही.

https://twitter.com/pjmdolI/status/1155598050959745026

सुटले का तुम्हाला समीकरण ? तुमचे उत्तर निश्चितच १६ किंवा १ आले असेल आणि हीच तर समस्येची खरी सुरुवात आहे. कारण नेटिझन्स कोणत्याही एका उत्तरावर सहमत होताना दिसत नाहीयेत.

जाणून घ्या असे का होत आहे :
एका ट्विटर वापरकर्त्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही कोणत्या गणिततज्ञाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवता यावर तुमचे उत्तर अवलंबून आहे. थोडक्यात तुम्हाला शाळेत BODMAS किंवा PEMDAS ची क्रिया शिकवली की नाही ही गोष्ट महत्त्वाची ठरते. म्हणजे जर तुम्हाला BODMAS क्रिया (Bracket, Of, Division, Multiplication, Addition and Subtraction) शिकवली असेल तर तुमचे उत्तर १६ असे असेल मात्र जर तुम्ही  PEMDAS  (Parentheses, Exponents, Division, Multiplication, Addition and Subtraction) चा वापर केला तर तुमचे उत्तर १ असे येईल.

https://twitter.com/NomeDaBarbarian/status/1156351630813495296

यातील तुम्ही कोणती पद्धत योग्य समजता आणि तुम्हाला कोणते उत्तर योग्य वाटते ? आणि तुमचे या समीकरणाविषयी नेमके मत काय आहे ते बातमीखाली कंमेंट करून नक्की सांगा.

आरोग्यविषयक वृत्त –