सोशल मीडियावर तरुणीचे अश्लिल फोटो व्हायरल

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – इन्स्टाग्रामवर तरूणीचे बनावट अकाऊंट तयार करुन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करीत तरूणीचे अश्लिल फोटो तयार करून व्हायरल करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत चंद्रशेखर मेश्राम (रा. श्रीनगर, गोंदिया, महाराष्ट्र) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जानेवारी रोजी आरोपी मेश्राम याने पीडित तरुणीचे इन्स्टाग्राम या सोशल साइटवर बनावट अकाउंट तयार केले.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करत त्या तरुणीचे अश्लिल फोटो तयार केले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत तरुणीची बदनामी व विनयभंग करत तिला धमकी दिली. तपास पोलिस करीत आहेत.

You might also like