9 वी पास मुलानं वडिलांना मदत करता करता भंगारापासून बनवली भन्नाट बाईक

पोलीसनामा ऑनलाईन – आपली एक बाईक असावी असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी अनेकजण मेहनत करून पैसा गोळा करण्याची तयारी करतात. पण तूम्ही स्वतः बाईक तयार करण्याचा प्रयत्न कधी केला आहे का, पण आज आम्ही तूम्हाला अशाच एका 9 वी पास असणा-या मुलाबद्दल सांगणार आहोत. ज्या मुलाने वडिलांना कामात मदत करता करता भंगारातील सामान वापरून भन्नाट बाईक तयार केली आहे. जी बाईक सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सय्यद सैप असे या मुलाचे नाव आहे. तो छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील मगरगोल्डच्या सिंगापूर गावातील राहणारा आहे. सैफचे वडील सायकल मॅकेनिकल आहेत. सैफचे अभ्यासात मन लागत नव्हते. म्हणून त्याने वडिलांना कामात मदत करायला सुरूवात केली. वडिलांकडून मॅकेनिकलचे काम शिकून सैफ स्वतः तयार झाला आणि भंगारात पडलेल्या वस्तूंचा वापर करून एक आकर्षक बाईक तयार केली. रस्त्यावरून ही बाईक जाते तेव्हा अनेकजण या बाईककडे पाहतच असतात. या बाईकमध्ये त्याने सुझुकीचे इंजिन आणि यामाहाची बॉडी लावली आहे. अशाप्रकारे पाच गाड्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट्सचा वापर करून ही आकर्षक बाईक तयार केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारे पार्ट्स जोडून बाईक बनवण्याचे काम मला खूप आवडते. गावातील लोकांना ही बाईक विकत घेण्याची इच्छा सुद्धा आहे.

काही दिवसांपूर्वी गौरव नावाच्या या 10 वीच्या मुलाने नावाप्रमाणे गौरव करावा अशी कामगिरी केली होती हा विद्यार्थी चंदीगडचा होता. गौरवने भंगारांपासून नवी कोरी बाईक तयार केली होती. ही बाईक पेट्रोलवर चालणारी असून 1 लीटर पेट्रोलमध्ये 80 किलोमीटर चालते. विशेष म्हणजे ही बाईक दिसायलाही खूप छान आहे. एखाद्या महागड्या बाईकप्रमाणे या बाईकचा लूक आहे. ही बाईक चालवतानाचे फोटोही गौरवने शेअर केले आहेत. तीन वर्षांपूर्वीसुद्धा त्यानं अशीच एका बाईक तयार केली होती. पण बाईक जास्त वेगान चालत नव्हती. त्यानंतर ही बाईक तयार करण्यासाठी गौरव प्रयत्न करत होता. अखेर त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला.