काय सांगता ! होय, नोकरीवर नव्हता तरी देखील तब्बल 15 वर्षांपासून बँकेत जमा व्हायचा पगार, कसा केला असेल ‘जुगाड’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या 15 वर्षापासून काम न करताच एका व्यक्तीला घरबसल्या पगार मिळत असल्याचा अजब प्रकार इटलीतून समोर आला आहे. मेडीकल विभागात करणारी ही व्यक्ती कोणतीही नोटीस न देता कामावर येत नव्हती. सगळ्यात आर्श्चयकारक बाब म्हणजे कामावर नसतानाही या व्यक्तीला प्रत्येक महिन्याची सॅलरी मिळत राहिली. या माणसाने पब्लिक सेक्टर जॉब्समध्ये दिर्घ सुट्टी आणि सॅलरी मिळवण्याचा रेकॉर्ड केला आहे. या माणसाला 15 वर्षात 5.38 युरो म्हणजेच जवळपास 4.8 कोटी रुपये पगार मिळाला आहे.

रिपोर्ट्सनुसार, 67 वर्षीय या माणसाची अद्याप ओळख पटली नाही. या माणसाचे 2005 मध्ये आपल्या बॉसबरोबर भांडण झाले होते. त्याने मॅनेजरला धमकीही दिली होती. काही काळानंतर मॅनेजर निवृत्त झाला. त्यानंतर हा माणूस ऑफिसमध्ये अनुपस्थित राहू लागला, असे करत करत तो तब्बल 15 वर्ष कामावर गेलाच नाही. अलिकडेच पोलिसांनी धोका दिल्याप्रकरणी तसेच सुनावणीला अनुपस्थित राहिल्या प्रकरणी या माणसाची चौकशी सुरू केली. त्यावेळी हा खुलासा झाला. विशेष म्हणजे एचआर विभाग आणि मॅनेजरलाही याबाबत काही कल्पना नव्हती. ऑफिसला येत नसतानाही या माणसाला पगार कसा काय दिला जात होता. याबाबत पोलिस चौकशी करत आहेत. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, काही मोठ्या अधिकाऱ्यांंचा हा प्रकरणात हात असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.