Viral Photo | पत्नी DSP मग कसली भीती? काम नसलेल्या पतिला रातोरात बनवले IPS; PMO ने घेतली गंभीर दखल

भागलपूर (बिहार) : वृत्तसंस्था – Viral Photo | देशाच्या राजकारणामध्ये घराणेशाही प्रत्येकाने पाहिली आहे. महिलांना आरक्षण असल्याने घरातील महिलांना किंवा पत्नीला निवडणुकीत (Election) उभे करुन निवडून आणायचे. त्यानंतर पत्नीच्या नावावर तीच्या पतीने सर्व कारभार पाहयचा हे अनेक ठिकाणी पहायला मिळते. मात्र बिहारमध्ये असा एक प्रकार घडला आहे की, याची दखल PMO ला घ्यावी लागली. या प्रकारामुळे बिहारमध्ये (Bihar) एकच खळबळ उडाली आहे.

कहलगावच्या एसडीपीओ (Sub Divisional Police Officer) रेशू कृष्णाने (Reshu Krishna) आपल्या रिकामटेकड्या पतीला रातोरात आयपीएस (IPS) अधिकारी बनवले. या दोघा पती-पत्नीने गणेवेशात फोटो काढून तो सोशल मीडियावर (social media) पोस्ट केला. आणि संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली. कोणीतरी याची तक्रार पंतप्रधान कार्यालयाच (PMO) केली. व्हायरल फोटोमध्ये रेशू कृष्णा यांचा पती आयपीएसच्या वर्दीमध्ये (IPS uniform) दिसत आहे. विशेष म्हणजे तो काहीच कामधंदा कत नाही.

सोशल मीडियात फोटो व्हायरल
रेशू कृष्णा यांनी सोशल मीडियात व्हायरल केलेल्या फोटोमध्ये पतीच्या अंगावर आयपीएसची वर्दी दिसत आहे. खांद्यावरील बॅजवर आयपीएस लिहिलेलं आहे. डोक्यावर टोपी आहे. दोघांनी पोलिसांच्या कारमध्ये हा फोटो काढत व्हिक्ट्री साईन (Victory sign) दाखवली आहे. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर कोणीतरी याची तक्रार पीएमओकडे केली. तसेच रेशू कृष्णा यांचा पती काहीच काम करत नाही. मग त्याच्याकडे आयपीएसची वर्दी कशी काय दिली ? असा सवाल करण्यात आला.

 

सोशल मीडियातून फोटो डिलीट

रेशू कृष्णा या सांगत फिरतात की त्यांचा पती आयपीएस आहे आणि पीएमओमध्ये काम करतात. अशा प्रकारची तक्रार आल्यावर पीएमओने याची गांभीर्याने दखल घेतली आणि ही तक्रार बिहार पोलीस मुख्यालयाला (Bihar Police Headquarters) पाठवून दिली. बिहार मुख्यालयाने यावर चौकशी लावूली असून रेशू यांचा पती आयपीएस अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. आता त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई (Legal action) केली जाणार आहे. चौकशी मागे लागताच रेशू कृष्णा यांनी हा फोटो सोशल मीडियातून डिलीट केला आहे.

शिक्षेची तरतूद
सामान्य लोकांना अशा प्रकारे वर्दी घालण्याची परवानगी नाही.
असे केल्यास तीन वर्षाची शिक्षा आणि दंडाची कारवाई केली जाते.
तर आयपीएस कलम 140 नुसार तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा आहे.

Web Title :- Viral Photo | bhagalpur sdpo kahalgaon reshu krishna made her husband ips uniform pmo action

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ganesh Raskar Murder Case | कुख्यात गुंड गणेश रासकर खून प्रकरणातील आणखी दोघांना अटक, धारदार हत्यारे जप्त

Yo Yo Honey Singh | यो यो हनी सिंहच्या विरूद्ध पत्नीने दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा

Pune News | सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीस वरदान ठरणार्‍या राजाराम पुल ते फन टाईम उड्डाणपुलाच्या निविदेला मंजुरी