Viral Photo | काय सांगता ! होय, शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयावर जेलमध्ये असलेल्या माजी पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मांचा फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Viral Photo | विरारमध्ये प्रमोद दळवी (Virar Pramod Dalvi) यांनी सुरु केलेल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयावर (Shivsena Office) तळोजा जेलमध्ये (Taloja Jail) असलेल्या एन्काउंट स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांचा फोटो लावल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या संपर्क कार्यालयावर लावण्यात आलेल्या पोस्टरवर शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या फोटोसह इतर नेत्यांचे फोटो (Viral Photo) आहेत. प्रमोद दळवी हे नालासोपारा (Nalasopara) विधानसभा मतदार संघाचे संघटक असल्याने ही विशेष बाब मानली जात आहे.

नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेने आयत्यावेळी नालासोपाराचे बविआचे आमदार क्षितीज ठाकूर (MLA Kshitij Thakur) यांच्या विरोधात प्रदीप शर्मा यांना निवडणुकीत उतरविले होते. मात्र, त्या निवडणुकीत प्रदीप शर्मा यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते नालासोपारा मतदार संघात फिरकलेही नव्हते. प्रदीप शर्मा यांचा उजवा हात म्हणून प्रमोद दळवी यांना ओळखले जाते. त्यांनी सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयावर प्रदीप शर्मा यांचा फोटो लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

मनसुख हिरेन प्रकरणात (Mansukh Hiren case) सहभाग असल्याचा पुरावा मिळाल्यानंतर माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना एनआयएने (NIA) अटक केली असून ते सध्या ते एनआयएच्या कोठडीत आहेत.
मागील महिन्यात त्यांची ईडीने (ED) चारवेळा चौकशी केली होती.
असे असताना शिवसेनेला अडचणीचे ठरणाऱ्या प्रदीप शर्मा यांचा फोटो बॅनरवर लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात पालघर जिल्ह्याचे संपर्क नेते आमदार रवींद्र फाटक (MLA Ravindra Phatak)
यांना या संदर्भात विचारले असता, अगोदर त्यांनी हा फोटो जुना असेल असे सांगितले,
तर नंतर मात्र याबाबत आपल्याला माहिती नसून माहिती घेऊन सांगतो
असे सांगतो असे सांगितल्याने शिवसेनेत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत आहे.

Web Title :- Viral Photo | former encounter specialist now in jail pradeep sharma photo on virar shivsena office

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Fake Currency | कोल्हापूरमध्ये 200 नोटेपासून बनवल्या 2000 च्या हुबेहुब नोटा, पण…

Pune Crime | सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; येरवडा परिसरातील घटना, पती स्वप्निल बाफनाला अटक

Aadhar Card Verify | फसवणूक टाळण्यासाठी ड्रायव्हर, नोकर, भाडेकरूचं आधार कार्ड Verify कसं कराल? जाणून घ्या एकदम सोपी प्रक्रिया