कारच्या बोनटवर रोमान्स करताना ‘स्पॉट’ झालं ‘न्यूड’ कपल, फोटो व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तैवानमधील गूगल स्ट्रीट व्ह्यू कॅमेर्‍याने घेतलेल्या छायाचित्रांमधून डोंगरांमधील उजाड रस्त्यावर एका जोडप्याला आपत्तीजनक अवस्थेत रोमान्स करताना दाखविण्यात आले. ही छायाचित्रे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहेत. हे जोडपे त्यांच्या कारच्या बोनटवर रोमान्स करत असल्याचे या चित्रांमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही पूर्णपणे नग्न आहेत. गूगल मॅपवर ही छायाचित्रे प्रथम सोशल मीडिया वापरकर्त्याने पाहिली होती.

अशा प्रकारे दिसली छायाचित्रे :
डेली मेल या वेबसाइटच्या म्हणण्यानुसार ही छायाचित्रे प्रथम पाहिलेल्या सोशल मीडिया वापरकर्त्याने असे म्हटले आहे की मी काही प्राणी पाहण्यासाठी गुगल स्ट्रीट व्ह्यू कॅमेऱ्याचा वापर केला पण मी वेगळेच काहीतरी पाहिले. तो म्हणाला की ते एक धक्कादायक दृश्य होते. इतकेच नव्हे तर त्या वापरकर्त्याने असेही म्हटले आहे की गुगल मॅप हा आतापर्यंतचा सर्वात मोठा शोध असून ती दैवी देणगी असल्यासारखे वाटत आहे.

वास्तविक, २०१८ मध्येही अशी छायाचित्रे गुगलवर उघडकीस आली होती. त्यावेळी गुगलने याविषयीचे नियम कडक करण्याविषयी बोलले होते आणि या संपूर्ण यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण असा प्रकार समोर आल्यानंतर त्यात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

तथापि, गुगलनेही या प्रकरणात स्पष्टीकरण दिल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. गुगलच्या प्रवक्त्याने असे म्हटले आहे की अश्लील सामग्रीवर बंदी घालण्यात आली होती. म्हणून ते फोटो काढले गेले आहेत.

याआधीही घडली होती घटना :
२०१८ मध्ये एका महिलेच्या छायाचित्रामुळे खळबळ उडाली होती ज्यामध्ये ती नग्न आणि स्तन दाखवताना दिसत होती. यानंतर गुगलने न्यूडिटी सेन्सरबद्दल बोलले होते. आता पुन्हा एकदा ही बाब चर्चेत आली आहे. जगातील बर्‍याच देशांमध्ये ही सुविधा वापरली जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे.

काय गूगल स्ट्रीट कॅमेरा :
गूगल स्ट्रीट कॅमेरा असे तंत्रज्ञान आहे जे गुगल मॅप्स आणि गुगल अर्थ मध्ये वैशिष्ट्य (फिचर) म्हणून उपलब्ध आहे. २००७ मध्ये लाँच केले गेलेले हे तंत्रज्ञान कार, ट्रायसायकल, बोटी इत्यादींचे फोटो कॅप्चर करते. गुगल स्ट्रीट कॅमेर्‍याच्या माध्यामातून जगभरातील फोटो घेता येतात. यामध्ये माहितीपूर्ण फोटोदेखील आढळतात तर कधीकधी वादग्रस्त फोटो देखील दिसतात. सुरुवातीला २००७ मध्ये, गुगलने अमेरिकेच्या बर्‍याच शहरांमध्ये ते बाजारात आणले गेले. त्यानंतर या तंत्रज्ञानाची जगभर प्रशंसा खूप चर्चा देखील झाली.

visit : Policenama.com