गाडीवर चढली ‘मद्यधुंद’ युवती, भररस्त्यात दिल्या अशा ‘पोज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. नशेत धुंद असलेली एका मुलगी रस्त्यात गाडी थांबवून मोठ्या प्रमाणात राडा करत होती. तिने मध्येच रस्त्यात गाडी उभी करून वाहतुकीला देखील अडथळा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमधील हि घटना असून येथील एका रस्त्यावर मध्यभागी थांबून या मुलीने अडथळाच निर्माण केला नाही तर अश्लील हावभाव करत लज्जास्पद कृत्य देखील केले. कधी ती नाचताना दिसली तर कधी आरडाओरडा करताना दिसली. त्याचबरोबर तेथील नागरिकांना शिव्या देखील देताना दिसली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होण्याआधीच मुलीने आपल्या गाडीसह त्या ठिकाणाहून पलायन केले. जमलेल्या नागरिकांनी या घटनेचे चित्रीकरण केले असून सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे.

दरम्यान, पोलिसांनी या मुलीविरोधात 336 कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी मुलीची ओळख पटवली असून तिला शोधण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visit : Policenama.com