Video : फिल्मी गाण्यावर म्हशीनं केला डान्स ! व्हिडीओ पाहून हसू आवरणं होईल कठीण

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला कौतुकही वाटेल परंतु हसूही आवरणार नाही. तुम्ही घोड्याला डान्स करताना अनेकदा पाहिलं असेल परंतु, एखाद्या म्हशीला कधी डान्स करताना पाहिलं आहे का? नक्कीच नसेल पाहिल. असा एक व्हि़डीओ समोर आला आहे ज्यात चक्क एक म्हैस डान्स करताना दिसत आहे.

ट्विटरवर एका युजरनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या युजरनं असं सांगितलं आहे की, तिला तिच्या बहिणीकडून हा व्हिडीओ आला आहे आणि सांगितलं आहे की, त्यांच्या घराजवळ कुणाला म्हशी सोबत डान्स करायला खूप आवडतं.

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, एका महिला म्हशीला डान्स करायला सांगते. यानंतर त्या महिलेचं ऐकल्यानंतर म्हैसही डान्स करू लागते. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना त्याचं हसू आवरलेलं नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी तर व्हिडीओ शेअरही केला आहे. अनेक युजर्सला हा व्हिडीओ खूप आवडला आहे.