Birthday SPL : जबरदस्तीनं झालं होतं सिल्क स्मिताचं लग्न, अ‍ॅक्ट्रेस बनण्यासाठी सासरवरून काढला होता पळ ! अशी बनली ‘सेक्स सायरन’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   साऊथ सिनेमातील अ‍ॅक्ट्रेस सिल्क स्मिता (Silk Smitha) ही भारतातील वादग्रस्त अभिनेत्रींपैकी एक होती. सिल्कचा जन्म 2 डिसेंबर 1960 रोजी आंध्र प्रदेशात झाला होता. 23 सप्टेंबर 1996 रोजी 36 व्या वर्षी सिल्कचं रहस्यमयी पद्धतीनं निधन झालं होतं. घरातील पंख्याला तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. अशा प्रकारे 17 वर्षे इंडस्ट्रीवर राज्य करणारी अभिनेत्री एक कोडं बनून जगातून निघून गेली. आपल्या बोल्डनेसमुळं ती कायमच लोकांच्या मनात राहील. 2011 सिल्कच्या वादग्रस्त आयुष्यावर सिनेमाही बनला होता. द डर्टी पिक्चर (The Dirty Picture) असं या सिनेमाचं नाव आहे. यात विद्या बालन (Vidya Balan) हिनं प्रमुख भूमिका साकारली होती.

खूपच गरीब कुटुंबात जन्मलेल्या सिल्क स्मिताचं खरं नाव विजयलक्षमी वदलपतला (Vijayalakshmi Vadlapatla) होतं. तिचं लहानपण खेळण्यांऐवजी चुलीपाशी गेलं. गरिबीमुळं तिचं शिक्षण झालं नव्हतं. तिला अ‍ॅक्ट्रेस होण्याची खूप इच्छा होती. गरीब कुटुंबामुळं तिची इच्छा नसतानाही तिचं लग्न करण्यात आलं. जबरदस्तीनं केलेल्या या लग्नामुळं तीही खूश नव्हती. सासरचे लोकही तिला त्रास देत असे. अशात तिनं कोणालाही काहीही न सांगता सर्व काही सोडून चेन्नई गाठली.

इथूनच तिचं अ‍ॅक्ट्रेस बनण्याचं स्वप्न आकार घेऊ लागलं. आधी तर तिनं मेकअप गर्ल म्हणून सिनेमात एन्ट्री केली आणि हिरोईनच्या चेहऱ्यांवर टचअपचं काम करू लागली. अशात तिनं निर्मात्यांसोबत मैत्री करायला सुरुवात केली. 19 व्या वर्षीच तिला पहिला सिनेमा मिळाला. इनाये थेडी असं या सिनेमाचं नाव होतं. 1979 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. यानंतर तिनं कधीही मागे वळून पाहिलं नाही.

या सिनेमानंतर पूर्ण साऊथ इंडस्ट्रीत सिल्क स्मिताची डिमांड वाढली. तिच्या बोल्ड अवतारांमुळं लोक तिला सेक्स सायरन म्हणून ओळखू लागले. मीडिया रिपोर्टनुसार सिल्कची वाढती लोकप्रियता पाहून डिस्ट्रीब्यूटर्सनी निर्माता आणि डायरेक्टरवर दबाव टाकायला सुरुवात केली. सिनेमात सिल्कचा आयटम डान्स असेल तर सिनेमा खरेदी करू असं ते म्हणून लागले.

डिस्ट्रीब्युटर्सच्या समोर प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शक आपल्या सिनेमात सिल्कला घ्यायला मजबूर झाले. त्यामुळं अवघ्या 10 वर्षांच्या करिअरमध्ये सिल्कनं 500 सिनेमे केले. 1980 साली आलेला वांडीचक्रम तिच्या करिअरमधील सर्वात हिट सिनेमा होता. या सिनेमातून तिला एवढी लोकप्रियता मिळाली की, तिनं विजयलक्ष्मी हे तिचं नाव बदलून सिल्क स्मिता केलं.

सिल्कनं रजनीकांत, कमल हासनपासून तर चिरंजीवीपर्यंत अनेक बड्या स्टार्ससोबत काम केलं आहे. अशात अनेक स्टार्ससाेबत तिचं नाव जोडलं गेलं होतं.

एवढ्या वेगानं यश मिळवणाऱ्या सिल्कचं 23 सप्टेंबर 1996 रोजी 36 व्या वर्षी रहस्यमयी पद्धतीनं निधन झालं होतं. मीडिया रिपोर्टनुसार ती एकटेपणामुळं दारूच्या अधीन गेली होती. याचमुळं तिनं आपलं आयुष्य संपवलं. तिच्या अशा जाण्यानं अनेकांनी सवाल उपस्थित केले होते.

 

You might also like