आता ‘या’ अभिनेत्याचं कमी वयात झालं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

पोलीसनामा ऑनलाइन – उत्तराखंडच्या अनेक सुपरहिट गाण्यात अभिनय करणारा अभिनेता जयपाल नेगीनं खूपच कमी वयात जगाचा निरोप घेतला आहे. दिल्लीत जयपालचं अचानक निधन झालं आहे.

पौडी गढवालमधील संगलाकोटीमधील रहिवाशी जयपाल नेगी आपल्या कुटुंबातसोबत दिल्लीत रहात होता. जयपालनं उत्तराखंडमधील अनेक सुपरहिट गाण्यात अभिनय करून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. असं सजमत आहे की, गेल्या अनेक दिवासंपासून जयपाल आजारी होता. त्याला किडनीची समस्या होती.

रविवारी (दि 24 मे 2020) रोजी अचाकन जयपालची तब्येत खराब झाली. यानंतर त्यांना दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यासाठी हवलण्यात आलं. परंतु दुर्दैवानं रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अनेकांनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचं निधन म्हणजे उत्तराखंड इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

जयपालनं पुष्पा छोरी पौडी खाल की, न्योला न्योला, चंद्रा छोरी, छुमा छलाया, अशा अनेक गाण्यात अभिनय केला आहे याशिवाय ही पहाडी गाणी गायलीदेखील आहे. त्यांची पत्नी कोमल राणा नेगी चंद्रा छोरी फेम देखील चर्चित अभिनेत्री आहे.