Video : गौहर खाननं लग्नच्या 1 आठवड्यापूर्वीच शेअर केला रोमँटीक व्हिडीओ !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आणि बिग बॉस 7 ची विनर गौहर खान (Gauahar Khan) अलीकडेच बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मध्ये सीनियर म्हणून दिसली होती. सध्या ती तिच्या खासगी लाईफमुळं चर्चेत आली आहे. गौहर खाननं म्युझिक कंपोजर इस्माइल दरबार (Ismail Darbar) चा मुलगा जैद दरबार (Zaid Darbar) सोबत आपलं नातं पब्लिक केलं आहे. लवकरच ती जैद सोबत लग्न करणार आहे. अलीकडेच गौहरनं तिच्या एंगेजमेंट रिगंचा फोटो सोशलवर शेअर केला होता. दोघांच्या लग्नाला एकच आठवडा बाकी आहे. अशात गौहरनं जैद सोबतचा रोमँटीक व्हिडीओ शेअर केला आहे जो सोशलवर जोरदार चर्चेत आहे.

गौहरनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती जैद सोबत दिसत आहे. कॅप्शनमध्ये ती म्हणते की, लग्नाला फक्त एक आठवडा राहिला आहे. व्हिडीओत दोघांचा रोमँटीक अंदाज दिसत आहे. दोघंही डान्स करत आहे. त्यांच्या प्रीवेडिंगचा हा व्हिडीओ आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर दोघंही ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसत आहे.

गौहरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी गौहरच्या या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, कपलनं लग्नासाठी आयटीसी मराठाची निवड केली आहे. याशिवाय ते पुण्यातील जाधवगड हॉटेलात प्रीवेडींग शुटही करू शकतात. गौहरला तिच्या लग्नला रॉयल टच द्यायचा आहे. 25 ला लग्न आहे परंतु 22 डिसेंबर पासून लग्नाचे प्रीवेडींग फंक्शन्स सुरू होणार आहेत. यानंतर 25 तारखेला निकाह आहे.