प्रसिध्द गायिकेची फाशी घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहीलं – ‘सासरच्यांना सोडू नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कन्नड सिनेमातील फेमस सिंगर सुश्मिता हिनं आत्महत्या केली आहे. आपल्या आईच्या घरी गळफास घेऊन सुष्मितानं आत्महत्या केल्याचं समजत आहे. या घटनेनं साऊथ इंडस्ट्रीलाही झटाक बसला आहे. अनेक मीडिया रिपोर्टमध्ये सुष्मिताच्या खासगी आयुष्याबद्दल हैराण करणारे खुलासे समोर आले आहेत. असंही सांगितलं जात आहे की, तिनं सुसाईड करण्यापूर्वी एक लांबलचक नोट लिहिली आहे. यात तिनं आत्महत्येचं कारण सांगितलं आहे. याशिवाय तिनं असंही म्हटलं आहे की दोषींना सोडू नका.

सोमवारी पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, हुंड्यामुळं झालेल्या छळातून हे पाऊल टाकण्यात आलं आहे. पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं की, 27 वर्षीय सिंगर सुष्मितानं रविवारी रात्री आत्महत्या केली. एका इंग्रजी वृत्ताच्या रिपोर्टमध्ये एका सुसाईड नोटचाही उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात असं सांगितलं जात आहे की, सुष्मितानं लिहिलं, “आई मला माफ कर. माझ्या चुकीची मला शिक्षा मिळत आहे. माझ्या पतीच्या आंटीनं मला टॉर्चर केलं. गेल्या काही दिवसांपासून ती मला घरातून जायला सांगत होती. त्यांना सोडू नका. शरत, वैदेही, गीता माझ्या मृत्यूसाठी थेट जबाबदार आहे. मी त्यांना खूप विनंती केली परंतु त्यांचं मन जराही पाघळलं नाही.”

पुढे तिनं लिहिलं की, “लग्नानंतरच हे सगळं सुरू झालं होतं. मला त्यांच्या घरी मरायचं नव्हतं. मी याबद्दल कधीच कोणाला काही सांगितलं नाही. माझ्यावर माझ्या माहेरीच भावाच्या हातून अंतिम संस्कार केले जावेत. माझ्या सासरच्यांना सोडू नका. नाही तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. मी तुम्हाला खूप मिस करेन.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुष्मितानं जवळपास दीड वर्षांपूर्वी शरत कुमार सोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतर पती आणि सासरच्या मंडळीसोबत तिच्या मतभेदांना सुरुवात झाली होती. प्रकरण जास्त वाढल्यानं ती तिच्या आईसोबत राहू लागली होती. तिनं श्रीसमान्य आणि हालू ठुप्पा यांसारख्या कन्नड सिनेमात गाणी गायली आहेत.