‘भूल भूलैया 2’ च्या सेटवर ‘कार्तिक-कियारा’ करत होते ‘रोमँस’, लीक झाला ‘व्हिडीओ’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा चार्मिंग बॉय कार्तिक आर्यन आणि मासूम अ‍ॅक्ट्रेस कियारा आडवाणी यांनी काही दिवसांपूर्वी आपला आगामी सिनेमा भूल भूलैया 2 ची जयपूरमध्ये शुटींग सुरू केली आहे. अलीकडेच त्यांनी सिनेमासाठी एक रोमँटीक गाणं शुट केलं. या गाण्याच्या शुटींग दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या लीक झाला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, कार्तिकनं कियाराला उचलून घेतलं आहे आणि गोल गोल फिरत आहे.

https://www.instagram.com/p/B9EhMjghy99/

कार्तिक आणि कियाराचा हा रोमँटीक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर कार्तिकनं व्हाईट कुर्ता आणि ब्लॅक पायजमा घातला आहे. कियारानं देखील घागरा घातल्याचं दिसत आहे. सिल्वहर घागरा आणि ऑरेज कलरच्या ऑफ शोल्डर टॉपमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

कार्तिक आणि कियाराचा हा रोमँटीका अंदाज चाहत्यांनाही आवडला आहे यात शंका नाही. काही दिवसांपूर्वीच कार्तिकनं त्याचा भूल भूलैया 2 सिनेमातील लुक इंस्टावरून शेअर केला होता. तेव्हापासून चाहते त्याच्या या सिनेमासाठी उत्सुक आहेत. आता कार्तिक आणि कियाराचा हा रोमँटीक व्हिडीओ पाहून चाहते आणखी उत्सुक झाले आहेत. कार्तिक आणि कियारा ही जोडी काय कमाल करते हे सिनेमा रिलीज झाल्यानंतर समजेलच. सध्या या व्हिडीओची मात्र खूप चर्चा सुरू आहे.

https://www.instagram.com/p/B8yJ6BchGBr/