टायगर श्रॉफच्या ‘डुप्लीकेट’नं भयंकर वादळी पावसात केला जबरदस्त डान्स ! व्हिडीओ झाला व्हायरल (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती डान्स करताना दिसत आहे. खास बात अशी की, हा टायगर श्रॉफ सारखा दिसत असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओ दुरून शुट केल्यामुळं तो व्यक्ती खरंच टायगर सारखा दिसत आहे असं वाटून जातं.

एका ट्विटर युजरनं हा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, टायगरसारखा दिसणारा एकजण भयंकर वारा आणि वादळात इमारतीच्या छतावर डान्स करत आहे. बॅकग्राऊंडला छान मायकल जॅक्सनचं गाणं सुरू आहे. सोशलवर या व्हिडीओला मोठी पसंती मिळताना दिसत आहे.

व्हिडीओ शेअर करताना त्या व्यक्तीनं टायगर श्रॉफलाही टॅग केलं आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यानं म्हटलं की, “हा टायगर श्रॉफ सारखा दिसणारा आज इंटरनेटवर चर्चेत आला आहे.” या व्हिडीओला आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो बागी 3 मध्ये दिसला आहे. टायगर हॉलिवूड सिनेमा रैम्बोच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. टायगर 2014 साली आलेल्या हिरोपंती या सिनेमाच्या सिक्वलमध्ये म्हणजेच हिरोपंती 2 मध्येदेखील काम करताना दिसणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like