प्रियंका चोपडाची बहिण मीराला ‘वेश्या’ अन् ‘पॉर्न’ स्टार म्हणत खुल्लमखुला दिली रेपची धमकी, साऊथ अ‍ॅक्टर ज्युनियर NTR सोबत प्रकरणाचं ‘कनेक्शन’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडाची बहिण(कजिन सिस्टर) आणि टॉलिवूड अॅक्ट्रेस मीरा चोपडा सध्या चर्चेत आली आहे. सोशलवर अॅक्टीव असणाऱ्या मीरा चक्क रेपची धमकी देण्यात आली आहे. इतकंच नाही तर अनेकांनी तिला सोशलवर शिवीगाळ करत तिला वेश्या आणि पॉर्न स्टार असंही म्हणाले आहेत. हे प्रकरण वाढत आहे हे पाहू मीरानं अॅक्शन घेत याची तक्रार राष्ट्रीय महिला आयोग आणि सायबर पोलिसांकडे केली आहे. ट्विटरवर हा सगळा राडा झाला असून ज्युनियर NTR च्या चाहत्यावर या प्रकरणाचा आरोप लावण्यात आला आहे.

अलीकडेच मीरानं ट्विटरवर प्रश्नोत्तराचं सेशन घेतलं. याच दरम्यान चाहत्यांनी तिला साऊथ इंडियन अॅक्टर ज्युनियर NTR बद्दल प्रश्न केले. यावर ती म्हणाली ती ज्युनियर एनटीआरला ओळखत नाही. याशिवाय मी त्याची नाही तर महेश बाबूची फॅन आहे असंही ती म्हणाली. यानंतर अनेक चाहत्यांना राग अनावर झाला. अनेकांनी तिला शिवीगाळ केली, अपशब्द वापरले. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एका चाहत्यानं तर चक्क तिला रेपची धमकी देली. इतकंच नाही तर तिला वेश्या आणि पॉर्न स्टार म्हणूनही संबोधलं.

यानंतर ट्विटरवर राडा सुरू झाला आणि दोन गट पडले. एक ग्रुप तिला शिव्या देऊ लागला तर एक तिला सपोर्ट करू लागला. ट्विटरवर #WesupportMeeraChopra ट्रेंड करताना दिसला. मीराला अशा प्रकारे धमकी देणाऱ्यांची तक्रार तिनं राष्ट्रीय महिला आयोग आणि सायबर पोलिसांकडे केली आहे.

मीरानं या प्रकरणी ज्युनियर एनटीआरला ट्विटरवर टॅगही केलं आहे. याबद्दल तिनं त्याला सवालही केला आहे. अशा प्रकारच्या चाहत्यांसोबत तुला यशस्वी वाटतं का असंही ती म्हणाली आहे.

मीराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं 2014 साली आलेल्या गँग ऑफ घोस्ट सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. गेल्यावर्षी आलेल्या सेक्शन 375 या सिनेमात मीरा शेवटची दिसली होती. या सिनेमात अक्षय खन्ना आणि ऋचा चड्ढा लिड रोलमध्ये होते. बॉलिवूडव्यतिरीक्त मीरानं तमिळ आणि तेलगू सिनेमातही काम केलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like