नुसरत जहाँ बनली सन 2019 ची मोस्ट डिझायरेबल वुमन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टीएमसी खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांना कलकत्ता टाईम्सने ‘मोस्ट डिजायरेबल वूमन ऑफ 2019’ (Most Desirable Woman of 2019) म्हणून निवडले आहे. असुर या चित्रपटातून नुसरत यांनी तब्बल 2 वर्षानंतर पुनरागमन केलं आहे. लग्नानंतरचा हा त्यांचा पहिलाच चित्रपट असेल. या चित्रपटात अबीर चटर्जी आणि जीत त्याच्यासोबत दिसणार आहेत.

नुसरत जहांला हे विजेतेपद मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, ‘लोकांची मानसिकता बदलत आहे हे पाहून मला आनंद होत आहे आणि त्यांना हे समजले की विवाहित लोकदेखील अव्वल असू शकतात. तसेच त्या म्हणाल्या बॉलिवूडमधील विवाहित स्त्रियांकडे पाहा, त्या डिझायरेबल नाहीत का ? तर त्या पूर्णपणे डिझायरेबल आहेत आणि मला आनंद आहे की आता टॉलीवुड देखील त्याच विचारसरणीने पुढे जात आहे. ज्यांनी मला वोट केले त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानते’ असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांना पुढे विचारण्यात आले की दिवसातून तुम्ही किती वेळा आरसा पाहतात. यावर नुसरत यांनी उत्तर दिले की, ‘आरसा माझ्या व्यवसायात मोठी भूमिका बजावत असतो. लहानपणी मी रडताना कशी दिसायचे हे पाहण्यासाठी आरश्यासमोर जाऊन रडायचे. एका वृत्तपत्राने त्यांच्याशी बोलताना पुढील योजनांबद्दल विचारले असता नुसरत म्हणाल्या की आता त्या वर्षात फक्त दोन चित्रपट करतील, कारण खासदार म्हणून त्यांच्या अनेक जबाबदाऱ्या आहेत त्या त्यांना पार पाडायच्या आहेत.