COVID-19 : ‘कोरोना’ची लक्षणं नसतानाही पॉझिटीव्ह आढळला ‘हा’ पाकिस्तानी अ‍ॅक्टर-डायरेक्टर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पाकिस्तानातही कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाची 4728 नवीन प्रकरणं समोर आली आहे ज्यानंतर बाधितांचा एकूण आकडा आता 1 लाखांच्या पुढे गेला आहे. अलीकडेच पाकचा अॅक्टर, स्क्रीन रायटर, प्रोड्युसर, डायरेक्टर आणि कॉमेडीयन वसय चौधरी यानं नुकतीच चाहत्यांना माहिती दिली की तो कोरोना पॉझिटीव्ह असून सध्या आयसोलेशनमध्ये आहेत.

वसय चौधरीनं इंस्टा स्टोरीवरून याबबात माहिती दिली आहे. वसयनं लिहिलं की, “मी कॉविड-19 पॉझिटीव्ह असूनन सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षण नव्हती. माझं कुटुंब निगेटीव्ह आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत मी त्यांना आधीच सूचना दिली आहे की त्यांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. गरज पडल्यास स्वत:ला सेल्फ आयसोलेट करा.”

https://twitter.com/30Kumaar/status/1270291148700094465?s=20

वसयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर वसय चौधरीनं पाकिस्तानी कॉमेडी शोज आणि सिनेमांसाठी कहाणी लिहिली आहे. त्याच्या लोकप्रिय प्रोजेक्ट्समध्ये जवानी फिर नहीं आनी आणि मैं हूं शाहिद अफरीदी असे शोज आहेत. कैफे चिल, अरमान, डॉंकी किंग अशा काही प्रोजेक्ट्समध्ये तो अॅक्टर म्हणून दिसला आहे.