रामानंद सागरांच्या नातवाची मुलगी ‘टॉपलेस’ फोटोशुटनंतर पुन्हा एकदा चर्चेत ! आता शेअर केले ‘हे’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध टीव्ही शो रामायणचे दिग्दर्शक रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या नातवाची मुलगी (पणतू) साक्षी चोपडा (Sakshi Chopra) नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. आपल्या फोटोंमुळं कधी साक्षी ट्रोल होताना दिसते तर आपल्या दिलखेच आणि बोल्ड अदांमुळं चाहते घायाळ होतानाही दिसतात. अनेकदा तिनं चाहत्यांसोबत न्यूड फोटोही शेअर केले आहेत. असे फोटो शेअर करणं तर साक्षीचा आवडता छंद आहे. आपल्या काही फोटोंमुळं साक्षी पुन्हा चर्चेत आली आहे.

साक्षीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहे. यात साक्षी खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं बिकिनी घातली आहे. यात अनन्या तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. खास बात अशी तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.

साक्षीचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

साक्षीबद्दल बोलायचं झालं तर ती इतर बॉलिवूड स्टारकिडपेक्षा खूपच वेगळी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिला बॉलिवूडमध्ये किंवा ॲक्टींगमध्ये विशेष असा रस नाही. त्यामुळे ॲक्टींगसाठी अनेक ऑफर्स येऊनही तिनं या सर्व ऑफर्स नाकारल्या आहेत. साक्षीला गाणं गायला खूप आवडतं. तिचा आवडता छंद म्हणजे गाणं आहे असं म्हणायलाही हरकत नाही. साक्षी गाण्याचे अनेक कार्यक्रम करत असते. तिच्या युट्युब चॅनलवर तिची अनेक गाणी उपलब्ध आहेत. साक्षी चांगली सिंगर तर आहेच सोबत ती एक मॉडेलही आहे. तिचे मॉडेलिंगचे अनेक फोटो ती सोशलवर शेअर करत असते. साक्षी भारत नाही तर लॉस एजिलिस, कॅलिफोर्नियामध्ये राहते.