Video : सपना चौधरी ‘चटक मटक’वर ‘थिरकली’, लाखो लोकांनी पाहिला ‘हा’ व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंथा –  हरियाणाची स्टार डान्सर सपना चौधरी यांचा एक डान्स व्हिडीओ यूट्यूब वर सध्या खूप पहिला जात आहे. डान्समध्ये निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली सपना चौधरी अतिशय सुंदर दिसत आहे. या गाण्यामध्ये सपना चौधरी यांचा जुना अंदाज अनेक दिवसानंतर दिसून आला आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ यूट्यूब वर अनेक लोकांकडून पहिला जात आहे.

https://www.youtube.com/watch?time_continue=7&v=uC-PeMdCSj8

यूट्यूब वरील जास्त पाहिल्या जात असलेल्या या व्हिडीओ मध्ये सपना ‘चटक-मटक’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सपना ने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे त्यावर सपना अतिशय सुंदर दिसत आहे. ज्या एनर्जीने ती डान्सची सुरुवात करते ते मात्र लाजवाब आहे.
व्हिडीओ जुनाच मात्र पुन्हा व्हायरल होतोय 

हा व्हिडीओ २२ मे २०१८ ला  यूट्यूब वर टाकला गेला होता. आत्तापर्यंत २० लाख लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. या व्हिडीओ वर सपनाच्या चाहत्यांच्या भरपूर कमेंट्स येत आहेत. प्रत्येकजण  सपनाच्या एनर्जेटिक परफॉर्मन्सचे कौतुक करत आहे. तसं सपना साठी चाहत्यांकडून वाहवा मिळवणे ही काही नवीन गोष्ट नाही. सपना आपल्या प्रत्येक व्हिडीओ च्या माध्यमातून समाज माध्यमांवर अशा प्रकारे व्हायरल होत असते ज्यामुळे तिची जादू आपल्या चाहत्यांवर पडल्याशिवाय राहत नाही.

बिग बॉस मुळे भेटली एक नवीन ओळख 

आता सपना चौधरी यांच्या फॅन फॉलोइंग वर काम करण्याच्या पद्धतीमध्ये खूप सारे बदल दिसून येत आहेत. हे सर्व बदल त्यांनी बिग बॉस मध्ये प्रवेश केल्यानंतर दिसून येत आहेत. सपना चौधरी यांना बिग बॉस मुळे एक नवीन स्टारडम भेटला आहे. लोकांना पडद्यावर दिसणाऱ्या सपनाचा एक नवीन

पैलू पहायला मिळाला आहे. इथून पुढे सपना चौधरी यांच्यासाठी करिअरचे नवीन दरवाजे उघडले गेले आहेत. त्यांना केवळ बॉलिवूडच नाही तर पंजाबी,भोजपुरी इंडस्ट्रीमधून सुद्धा ऑफर मिळत आहेत. आता सपना चौधरी यांचे चाहते केवळ हरियाणा पुरते मर्यादित राहिले नसून देशभरात त्यांचे भरपूर चाहते झाले आहेत.