सपना चौधरीसोबत जानेवारीत केला विवाह आणि ऑक्टोबरमध्ये बनला पिता ! जाणून घ्या कोण आहे वीर साहू

मुंबई : हरियाणाची डान्सर ते रियलिटी शो स्टार आणि नंतर चित्रपटांमध्ये पाऊल टाकणारी सपना चौधरी सध्या आपल्या व्यक्तीगत जीवनाबद्दल खुप चर्चेत आहे. वृत्त आहे की, तिने 4 ऑक्टोबरला एका बाळाला जन्म दिला आहे. बातमी तर ही सुद्धा आहे की, याच वर्षी जानेवारीमध्ये तिने आपला बॉयफ्रेंड वीर साहू सोबत विवाह केला होता. सपना आई झाल्याची बातमी वार्‍यासारखी पसरल्यानंतर फॅन्सने प्रश्न उपस्थित करण्यास सुरूवात केली. कारण या प्रकरणात अजूनपर्यंत सपना चौधरीकडून कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही.

सपनाने नाही केला कोणताही उल्लेख
सपना चौधरी नेहमीच सोशल मीडियावर खुप अ‍ॅक्टिव्ह असते, परंतु तिने कधीही आपल्या नात्याबाबत काहीही म्हटले नाही. मार्च महिन्यात जेव्हा सपनाचा गुपचुप साखरपुडा झाल्याचे वृत्त आले तेव्हा म्हटले गेले की, लग्न सुद्धा गुपचुप होणार आहे. सपनाच्या राजकुमाराचे नाव सुद्धा त्यावेळी समोर आले आहे. त्याचे नाव आहे हरयाणाचा सिंगर वीर साहू. परंतु, सपनाच्या फॅन्सला तेव्हा चांगलाच धक्का बसला, जेव्हा ती आई होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर वार्‍यासारखी पसरली.

वीर साहूने फेसबुक लाइव्हमध्ये दिले उत्तर
सपना चौधरीचा पती म्हणून चर्चेत असलेल्या वीर साहूने फेसबुकवर लाइव्ह येऊन खुशखबर दिली आणि ट्रोलर्सला उत्तर दिले. त्याने सपनाचे नाव घेतले नाही, परंतु सांगितले की, लग्नानंतर कोणताही प्रोग्राम यासाठी नाही केला, कारण त्याच्या काकांचे निधन झाले होते.

कोण आहे वीर साहू
हरयाणाचा सिंगर वीर साहू हरयाणात खुप प्रसिद्ध आहे, परंतु त्याच्या गाण्यांना काही खास ओळख मिळालेली नाही. वीर साहू अ‍ॅक्टरसुद्धा आहे. त्याने अनेक म्यूझिक व्हिडिओजमध्ये आपल्या आवाजासह अ‍ॅक्टर म्हणून देखील काम केले आहे. त्यास हरयाणाचा बब्बू मान म्हटले जातो.

सिंगिंग-अ‍ॅक्टिंगसाठी सोडले एमबीबीएस
सपना चौधरी प्रमाणे वीर साहू सुद्धा जाट कम्युनिटीतून आहे. सिंगिंग आणि अ‍ॅक्टिंगसाठी त्याने एमबीबीएसचा अभ्यास सोडला होता. वीरचे पहिले गाणे थाड्डी- बड्डी खुप हिट झाले होते. त्याने पंजाबी फिल्म ’गांधी फिर आ गए’ मध्ये काम केले आहे.

फॅन्सला अजूनही प्रतिक्षा
वीर साहूचे बोलणे किती खरे आहे, हे सपनाच्या फॅन्सला तिच्या तोंडून ऐकायचे आहे. ते प्रतिक्षा करत आहेत की, सपना ही खुशखबर लवकरच सर्वांसोबत शेयर करेल.