Video : ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीचे ठुमके पाहून लोकांनी उधळल्या नोटा !

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री, सिंगर, एक्स बिग बॉस (Bigg Boss) स्पर्धक आणि स्टार डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टिव असते. सपनाचा एक डान्स व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. सपनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

स्टार डान्सर सना चौधरीचा एक डान्स व्हिडिओ सध्या यूट्यूबवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. यात हरियाणवी गाण्यावर सपना जोरदार ठुमके लगावताना दिसत आहे. सपनाचा जबरदस्त डान्स पाहून प्रेक्षकही पागल झाले आहेत. सपनाचा हा डान्स एवढा व्हायरल झाला आहे की, याला अद्याप कोट्यवधी लोकांनी पाहिलं असून अजूनही लोक वारंवार हे गाणं पाहात आहेत. सपनाची फॅन फॉलोविंग एवढी मोठी आहे की, तिची गाणी रिलीज होताच हिट होत असतात.

लुकबद्दल बोलायचं झालं तर सपनानं फ्लॉरल ग्रीन सूट घातला आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या डान्स मुव्सवर प्रेक्षक एवढे फिदा झाले आहेत की, लोकांनी नोटा उधळल्या आहेत. सुपरहिट हरियाणवी साँग यार तेरा चेतक पर चले वर सपना डान्स करत आहे.

4 ऑक्टोबर रोजी सपनाननं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सपनानं जानेवारीत बॉयफ्रेंड वीर साहू (Veer Sahu) सोबत सिक्रेट मॅरेज केलं होतं. सपना चौधरीची लोकप्रियता गगनाला भिडली आहे.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस 11 या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे.