‘ही’ लहान मुलगी देतेय ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीला ‘टक्कर’, डान्स पाहून चाहते ‘पागल’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेत्री, सिंगर, एक्स बिग बॉस स्पर्धक आणि स्टार डान्सर सपना चौधरी जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टीव असते. सपनाचा एक डान्स व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. सपनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. खास बात अशी की व्हिडीओत तिच्या स्टेजवर तिच्यासोबत एक लहान मुलगी दिसत आहे जी तिला टक्कर देत आहे.

स्टार डान्सर सना चौधरीचा एक डान्स व्हिडीओ सध्या युट्युबवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. इंग्लिश मीडियम असं या हरियाणवी गाण्याचं नाव आहे. तसं पाहिलं तर तिचा हा व्हिडीओ जुनाच आहे. यात सपना जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओत सपना एका लहान मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे. ती लहानगी सपनाला काट्याची टक्कर देताना दिसत आहे. मुख्य म्हणजे सपना सोबत नाचताना जी मुलगी दिसत आहे ती सपनाची खूप मोठी फॅन आहे. सपना सोबत डान्स करताना ही लहानगी सपनाच्या स्टेप हुबेहूब कॉपी करत आहे.

हे गाणं एवढं व्हायरल झालं आहे की, याला अद्याप 9 कोटींहून लोकांनी पाहिलं असून अजूनही लोक वारंवार हे गाणं पहात आहेत. सपनाची फॅन फॉलोविंग एवढी मोठी आहे की, तिची गाणी रिलीज होताच हिट होत असतात. सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस 11 या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे.