Video : ‘नो पँट’ लुकमध्ये Hot अवतारात ‘कॅटवॉक’ करताना दिसली ‘स्टार डान्सर’ सपना चौधरी ! चाहते म्हणाले- ‘कत्ल करेगी के’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री, सिंगर, एक्स बिग बॉस (Bigg Boss) स्पर्धक आणि स्टार डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त ॲक्टीव असते. सपनाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. सपनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अलीकडेच सपनाचं एक नवीन गाणं रिलीज झालं आहे. कत्ल (Katal) असं या गाण्याचं नाव आहे. आई झाल्यानंतरचं तिचं हे पहिलंच गाणं आहे. कॅटवॉक वाल्या एका व्हिडीओमुळं ती सध्या चर्चेत आली आहे.

सपनानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती खूपच बोल्ड वेस्टर्न लुकमध्ये दिसत आहे. थाय हाय बूट्स आणि नो पँट लुकमध्ये ती खूप ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. बॅकग्राऊंडला तिचं नुकतंच रिलीज झालेलं कत्ल करेगी के सुरू आहे.

व्हिडीओ शेअर करत तिनं लिहिलं की, नवीन गाणं कत्ल युट्युबवर पूर्ण पहा. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकजण तिचं कौतुक करत आहे. काहींनी तर तिच्याच गाण्याचे शब्द वापरत कमेंट करत म्हटलं आहे की, कत्ल करेगी के.

गाण्याबद्दल बोलायचं झालं र हे गाणं सिंगर मोहित शर्मानं गायलं आहे. सुमित बालंबिया यानं हे गाणं लिहिलं आहे.

4 ऑक्टोबर 2020 रोजी सपनाननं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सपनानं जानेवारी 2020 मध्ये बॉयफ्रेंड वीर साहू (Veer Sahu) सोबत एका मंदिरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत सिक्रेट मॅरेज केलं होतं. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या लग्नाची बातमी आणि फोटो समोर आले होते. सपना चौधरीची लोकप्रियता आता गगनाला भिडली आहे.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस 11 या रिॲलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे.