TV अभिनेत्री श्वेता तिवारीच्या ‘BOLD’ वेब सीरीजमधील पहिलं गाणं ‘रिलीज’, पहा ‘रोमँटीक’ अंदाज ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस श्वेता तिवारी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या ती चर्चेत असल्याचं कारण म्हणजे तिची आगामी वेब सीरीज आणि त्यातील तिचा बोल्ड अवतार. एकता कपूरच्या निर्मितीमधील अल्ट बालाजीची हम तुम और देम ही वेब सारीजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात श्वेताही दिसणार आहे. नुकतंच यातील नवीन गाणं रिलीज झालं आहे. यात श्वेता आणि अक्षय ओबेरॉयचा बोल्ड आणि रोमँटीक अंदाज पहायला मिळणार आहे.

काही दिसवांपूर्वीच हम तुम और देम या वेब सारीजचा ट्रेलर रिलीज झाला होता. यात श्वेता सिंगल मदरच्या भूमिकेत दिसणार आहे. तिला एक मुलगी आहे. यात ती आपल्याच वयाच्या माणसाच्या प्रेमात पडताना दिसते. यात अक्षय ओबरॉयनं ती भूमिका साकारली आहे जो 3 मुलांचा बाप आहे.

श्वेता तिवारी या सीरीजमधून आपला डिजिटल डेब्यू करत आहे. नुकतंच याचं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. कुछ इस तरह असे या गाण्याचे बोल आहेत. यात श्वेता रोमँस करताना दिसत आहे. याशिवाय सीरीजमध्ये तिचा बोल्ड अंदाजही दिसत आहे. यात तिचे अनेक लिप लॉक किसिंग सीन्स आहेत.

श्वेताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर एकता कपूरच्या कसौटी जिंदगी की या मालिकेतून श्वेता घराघरात पोहोचली होती. हम तम और देम या वेबसीरीज व्यतिरीक्त श्वेता मेरे डॅड की दुल्हन या मालिकेतही काम करताना दिसत आहे. यात ती वरूण बडोला सोबत काम करत आहे.