श्वेता तिवारीची मुलगी ‘पलक’नं दिली कियारा आडवाणीला ‘टक्कर’, ‘हॉट’ लुकनं केला ‘कहर’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टीव्ही स्टार श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या सोशलवर चर्चेत आली आहे. आधी मामाच्या लग्नातील फोटोंमुळं ती चर्चेत आली होती. यानंतर पुन्हा एकदा पलकनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी पलकचा हॉट लुक समोर आला आहे. पलकचे काही हॉट फोटो समोर आले आहेत जे सध्या सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. या फोटोत पलक तिवारी बॉलिवूड स्टार कियारा आडवाणीला टक्कर देताना दिसत आहे.

पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अलीकडेच तिनं कियारा आडवाणीच्या फोटो थीमवर आधारीत एक फोटोशुट केलं होतं. या फोटोत पलकचा हॉट आणि ग्लॅमरस अंदाज दिसत आहे. कियाराप्रमाणेच पलकनंही पानांच्या मागे उभं राहून पोज दिली आहे. फोटोत पलकनं जे एक्सप्रेशन दिले आहेत तेही कमाल आहेत.

https://www.instagram.com/p/B81bTeynlGC/?utm_source=ig_embed

सोशल मीडियावरून समोर आलेल्या या फोटोंमध्ये पलक आणि श्वेता मायलेकी नाही, तर बहिणी बहिणीच वाटत आहेत. पलकचे फोटो पाहून अंदाज येत आहे की, स्टाईलच्या बाबतीत पलक काही कमी नाही. याआधीही तिचे अनेक ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत जे सोशलवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पलकचे फोटो सोशलवर व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

https://www.instagram.com/p/B9Eztavnfs8/

https://www.instagram.com/p/B5SczewnJub/

https://www.instagram.com/p/B3TrXXGnKUB/

https://www.instagram.com/p/B1Qzvuhn6Vy/

https://www.instagram.com/p/B0Nqk3FHdTI/