Coronavirus : ‘कोरोना’मुळं 2 दिवसात ‘या’ अभिनेताचा मृत्यू, पत्नीनं सांगितलं शेवटच्या घटकेची कहाणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चीनमधून कोरोना विषाणू आता जगभरातील देशांमध्ये पसरला आहे. या विषाणूमुळे लोकांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. हा विषाणू सामान्य ते विशेष सर्व वर्गातील लोकांना प्रभावित करीत आहे. अलीकडेच या विषाणूची लागण झालेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. हॉलिवूड अभिनेता अँड्र्यू जॅक जे स्टार वॉर्ससारख्या चित्रपटात दिसले आहे. आश्चर्य म्हणजे 2 दिवसांपूर्वीच त्यांना कोरोना झाल्याची बातमी समोर आली होती. ज्यानंतर आता त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे.

अँड्र्यू जॅक 76 वर्षांचे होते. 2 दिवसांपूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये अँड्र्यू यांचे निधन कोरोना विषाणूमुळे झाले आहे. अभिनेता आणि बोलीभाषेचे प्रशिक्षक अँड्र्यू यांचे एजंट जिल मॅकलफ यांनी सांगितले की, अँड्र्यू यांचे मंगळवारी सरे रुग्णालयात निधन झाले.

मॅकलफ यांनी सांगितले की, ते थेम्सच्या सर्वात जुन्या हाऊसबोटमध्ये राहत होते. ते या वयातही कोणावर अवलंबून नव्हते परंतु ते आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत होते. अभिनयाबरोबरच ते बोलीभाषेचे प्रशिक्षकही होते. जॅक हे स्टार वॉर्डच्या मालिकेचा देखील एक भाग आहे.

त्याचवेळी, अँड्र्यू यांच्या मृत्यूच्या वेळी ऑस्ट्रेलियामध्ये क्वारंटाइन राहणाऱ्या त्यांच्या पत्नीने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, ‘दोन दिवसांपूर्वी अँड्र्यू जॅक यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागला नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्य त्याच्याबरोबर होते. ‘ त्याचबरोबर अँड्र्यू यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांचे चाहते सोशल मीडियावर दुःख व्यक्त आहेत.