Video : मिथुन चक्रवर्तीच्या सुनेचा आईसोबत जबरदस्त डान्स ! व्हिडिओ तुफान व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची सून मदालसा शर्मा (Madalasa Sarma) हिनं हिंदीपेक्षा साऊथ सिनेमात जास्त काम केलं आहे. मदालसा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. पुन्हा एकदा एका व्हिडिओमुळं मदालसा चर्चेत आली आहे.

व्हायरल होतोय व्हिडिओ

मदालसानं तिच्या इंस्टावरून एक व्हि़डिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. यात मदालसा तिच्या आईसोबत डान्स करताना दिसत आहे. मायलेकीचा हा डान्स चाहत्यांनाही खूप आवडला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ हजारो चाहत्यांनी पाहिला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

अनेकजण लाईक्स आणि कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत. काहींनी या वयात एवढा छान डान्स करण्यासाठी तिच्या आईचंही कौतुक केलं आहे. अनेकांनी मदालसाचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअरही केला आहे.

मदालसाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर सध्या ती टीव्ही शोमध्ये आपला जलवा दाखवत आहे. स्टार प्लसवरील अनुपमा या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत आहे. यात तिचा निगेटिव्ह रोल आहे. चाहत्यांना तिची भूमिका खूप आवडली आहे.

 

You might also like