Video : नेहा शर्मानं शेअर करताच झपाट्यानं व्हायरल झाली पोस्ट ! वारंवार पाहिला जातोय व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री नेहा शर्मा (Neha Sharma) त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या सोशल मीडियावर सुपर अ‍ॅक्टिव्ह असतात. खास बात अशी की, नेहा शर्मा तिच्या हॉट आणि बोल्डनेससाठी सोशल मीडियावर खूप फेमस आहे. नेहाची हॉट फिगर कायमच चाहत्यांना भुरळ घालत असते. नेहा पुन्हा एकदा तिच्या एका व्हिडिओमुळं चर्चेत आली आहे.

नेहानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती वर्कआउट करताना दिसत आहे. जीम पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत आणि याचा तिला खूप आनंद झाला आहे. याबद्दल नेहानं हा व्हिडिओ शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. कॅप्शनमध्ये तिनं तसा उल्लेखही केला आहे.

https://www.instagram.com/p/CHXqwdcguLl/

सध्या नेहाचा हा व्हिडिओ सोशलवर खूप व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून हा व्हिडिओ वारंवार पाहिला जात आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. नेहा यात खूपच फिट आणि ब्यूटिफुल दिसत आहे.

नेहाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती सिद्धार्थ शुक्लासोबत एका म्युझिक व्हिडिओत दिसणार आहे. दिल को करार आया असं या व्हिडिओचं नाव आहे. अलीकडेच नेहा इल्लीगल (Illegal) या वेब सीरिजमध्ये काम करताना दिसली. नेहा पहिल्यांदा चिरूथा (Chirutha) या तेलगू सिनेमात काम करताना दिसली होती. परंतु हिंदी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर मोहित सुरी डायरेक्टेड क्रूक हा तिचा पहिला हिंदी सिनेमा आहे. 2010 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. यानंतर नेहानं अनेक सिनेमात काम केलं आहे. तेरी मेरी कहानी, क्या सुपर कूल है हम, यमला पगला दीवाना, हेरा फेरी 3 असे तिचे अनेक सिनेमे सांगता येतील. तुम बिन 2, मुबारकां, तान्हाजी या सिनेमातही तिनं भूमिका साकारली आहे.